Harshawardhan Sapkal : संविधान घेऊन ऐतिहासिक काळाराम मंदिरात सपकाळांचा प्रवेश !

 

Harshvardhan Sapkal said Dr. Babasaheb Ambedkar was denied entry : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाकारला होता प्रवेश

Nashik : नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज (६ एप्रिल) रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, खासदार शोभा बच्छाव व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिराचे महंत सुधीरदास होते. महंत सुधीरदास यांनी १९३० साली मंदिरात प्रवेशापासून अडवणारे महंत हे माझे आजोबाच असल्याचे सांगून त्याबद्दल माफी मागून कुणाल गायकवाड यांचे मंदिरात स्वागत केले. यावेळी सपकाळ यांनी महंत सुधीरदास यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे आहेत. ते भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. आज राम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले.

Chandrashekhar Bawankule : सपकाळांनी आपली उंची तपासावी आणि मगच..

या काळाराम मंदिराला मोठा इतिहास आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी १९३० ते १९३५ पाच वर्ष १७ दिवस सत्याग्रह केला. पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते. यावेळी दंगल झाली. त्यात बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले होते. दुसऱ्या वर्षी ते गोलमेज परिषदेला गेले असता दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांनी सत्याग्रहाची धुरा सांभाळली. पण पाच वर्ष सत्याग्रह करूनही त्यावेळच्या व्यवस्थेने त्यांना प्रवेश दिला नव्हता. पण आज दादासाहेबांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांच्यासह आम्ही आज प्रभू रामाचे दर्शन घेतले आणि मंदिरात महंतांनी आमचे स्वागत केले, असे ते म्हणाले.

Karuna Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल, तोच मोठा विजय !

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा यावेळी पार पडला. मेळाव्याला संबोधित करताना सपकाळ म्हणाले की, देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, रोजगार नाहीत पण केंद्र सरकारने एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पहात बसलो आहोत. ते म्हणजे वक्फ बोर्ड. इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भूसंपादन करताना प्रार्थना स्थळे सुरक्षित रहावित अशी मागणी झाली.

१९१३ साली पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावित, यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते. वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे आणि त्यासाठीच हा सर्व खेळ सुरु असल्याचे सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे ‘एप्रिल फुल’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल

यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत खासदार डॉ. शोभा बच्छाव, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, माजी आमदार शिरीष कोतवाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व नाशिकचे प्रभारी ब्रीज दत्त यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.