Breaking

Harshawardhan Sapkal : खाजगीकरणामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

Harshvardhan Sapkal said that identify and fight future crises : शोषणाचे प्रमाण वाढत असल्याने भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या

Mumbai : कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहेत आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जात आहेत. यातून शोषणाचे प्रमाण वाढत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

कामगारांचे शोषण फक्त शहरांत होत नाही तर ते गावखेड्यांपर्यंत पोहोचले आहे. शोषणावर आधारीत ही व्यवस्था संपवण्याची गरज आहे. त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटीत लढा द्या, असे आवाहन सपकाळ यांनी केले. राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते.

Sanjay Nirupam : आदित्य ठाकरे लवकरच बनतील हत्यादी ठाकरे !

आधी उद्योगपती होते आता व्यापारी झाले आहेत आणि ते फक्त नफ्यासाठी काम करत आहेत. त्यांना कामगारांच्या कल्याणाचे काहीही देणेघणे नाही. मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे तर गरिब अधिक गरिब होत चालला आहे. पण देशाच्या पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही, “श्रीमंतांनी श्रीमंत होणे पाप आहे का?” असे पंतप्रधान म्हणतात, ही अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. पंतप्रधानांना गरिबांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. गरिब, कष्टकरी, कामगार यांच्या विरोधातील हे सरकार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Yashomati Thakur : तिवसा नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम!

मोदी सरकारचे कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे, त्यांची नियत खोटी आहे आणि निती तर नाहीच, अशा शक्तीविरोधात लढायचे आहे. कामगार वर्गासाठी लढले पाहिजे. कामगारांचे शोषण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही, कृती कार्यक्रम घेऊन काम करा, मोठी चळवळ उभी करा आणि एकत्र येऊन लढा द्या, असे आवाहनही हर्षवर्षन सपकाळ यांनी केले.