Harshvardhan Sapkal starts process of organizational reshuffle in Congress : जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती, निरीक्षकांच्या अहवालानंतर मोठ्या बदलांची शक्यता
Mumbai : काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आज (२८ मार्च) काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल करण्यात येणार आहेत.
फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच जिथे आवश्यक आहे तिथे नवीन चेह-यांना जबाबदारी दिली जाणार आहे. या संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांची बैठक आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Harshawardhan Sapkal : ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खाके के बिल्ली हज को चली’
बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, प्रफुल्ल गुडधे, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी उपस्थित होते. या बैठकीत प्रांताध्यक्षांनी निरीक्षकांना यासंदर्भात सूचना केल्या. हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल सादर करणार आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
Manikrao Kokate : ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार विमा नुकसान भरपाईचे २५५५ कोटी
हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामाचा झपाटा दाखवून दिला आहे. मृतप्राय पडलेल्या काँग्रेसला ते नवसंजीवनी देतील, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. नाना पटोले जेव्हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर आरूढ झाले, तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये जान फुंकली होती. ‘भारत जोडो’सारखे कितीतरी उपक्रम त्यांनी यशस्वी केले. त्याची परिणीती म्हणून काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रदेशाची धुरा श्रेष्ठींनी सोपवली. आता सपकाळ मृतप्राय काँग्रेसमध्ये जान फुंकतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.