Not Even Daughter of Minister Not Safe in State : गृहमंत्री आता तरी तोंड उघडतील का?
Buldhana : मुक्ताईनगर मधील छेडछाडीच्या प्रकारानंतर केंद्रीय मंत्र्याला पोलीस ठाण्यात ठिय्या द्यावा लागतो. हा कायदा व सुव्यवस्था बिघडल्याच्या घटनेचा सज्जड पुरावा आहे. राज्याला पूर्णवेळ स्वतंत्र गृहमंत्री असावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सपकाळ पुढे म्हणाले गृह विभाग खरोखर घाशीराम कोतवाल चालवत आहे, अशी अवस्था आता झाली आहे. पुण्यातील बलात्कार प्रकरण असो, की आता घडलेली मुक्ताईनगरची घटना असो यासंदर्भात गृहमंत्री आता तरी तोंड उघडतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गृहराज्यमंत्री बेताल वक्तव्य करतात. संपूर्ण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली आहे.
Harshawardhan Sapkal : बस्स झालं.. आता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा !
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील टक्कल पडण्याच्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले, की ज्येष्ठ संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी स्वतःच्या खर्चाने संशोधन करून ठराविक लॉटमध्ये आलेल्या गव्हामुळेच हा व्हायरस निर्माण झाल्याचे सांगितले आहे. मात्र बुलढाण्याचे केंद्रीय मंत्री व जिल्हाधिकारी त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते.
Harshawardhan Sapkal : सुभाष चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता हरपला
त्यांनी उलट सुलट विधाने करून बावस्कर हे प्रसिद्धीसाठी करीत असल्याचे म्हटले होते. मात्र आता बावसकरांचे संशोधन बरोबर असल्याचे सिद्ध होत आहे. जर बावस्कर यांचे संशोधन चुकीचे असेल तर तोच गहू मंत्री महोदय व जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभर खावा आणि बावस्कर प्रसिद्धीसाठी बोलतात, हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान सपकाळ यांनी दिले. मग अशावेळी त्या लॉटचा गहू सील का केला, असा प्रश्न येथे उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले.