नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कुठलीही अनियमित्ता सापडलेली नाही : Congress state president Harshawardhan Sapkal says no irregularities found in National Herald case
Nagpur : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काहीच दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. सामंत यांनी शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटीची पृष्ठभूमी तयार केली, असेही सांगण्यात येते. या घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ आज (१६ एप्रिल) नागपुरात सद्भावना यात्रेसाठी आलेले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महायुती शक्तिमान आहे आणि नरेंद्र मोदी त्यांचे शक्तिमान नेते आहेत, असं दाखवलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाबली असल्याचा भाव आणला जातो आहे. 238 आमदार आमच्यासोबत आहेत, असं ते सांगत असतात. एवढं असतानाही त्यांना नवीन मित्र जोडण्याची आवश्यकता वाटते, म्हणजेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.
मोदी सरकार सत्तेत येऊन अकरा वर्ष झाले. पण नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात त्यांच्या हातात कुठली अनियमित्ता सापडलेली नाही. नॅशनल हेरॉल्डमध्ये संचालकांना मानधन मिळत नाही किंवा यामध्ये विकण्याचा अधिकार नाही. नॉन प्रॉफिट कंपनी असल्यामुळे शेअर होल्डर्सला याचा लाभ मिळत नाही. ही कंपनी अवसायनात गेल्यावर याची सगळी संपत्ती सरकारजमा होईल. एवढ्यात कुठली अनियमित्ता होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना राहुल गांधी यांची भीती वाटत आहे, असे सपकाळ म्हणाले.
बीड प्रकरणात कायद्याचे अपयश जनतेने बघितले. अडचणीत आलेल्या लोकांना खलनायक ठरवणे आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मर्जीतील लोकांना टीआरपीत बसवणे. मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. सीआयडी, पोलीस आणि न्यायालयात नवीन मुद्दे येत आहेत.
Fake disability certificate : बदल्यांमध्ये अन्याय; दिव्यांग शिक्षक आक्रमक!
धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यांचा राजीनामा विरोधकांनी मागितल्यावर तपासावर प्रभाव पडू नये म्हणून राजीनामा दिला. त्या प्रकरणाचे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहीती होते. ते लीक झाल्यामुळे उद्रेक होईल, म्हणूनच राजीनामा घेतला. सरकार धनंजय मुंडेंना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.