Harshawardhan Sapkal : फडणविसांना अतिरिक्त काम झेपत नाहीये

 

Home Minister and Director General of Police are puppets : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका; महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवायचा प्रयत्न

Mumbai फडणविसांना गृहविभागाला वेळ देता येत नाही, त्यांना अतिरिक्त काम झेपत नाही. त्यांनी राज्याचे हित लक्षात घेऊन पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मुदतवाढ दिलेल्या पोलीस महासंचालकांना सन्मानाने निवृत्त करावे. नविन सक्षम निष्पक्षपाती अधिकाऱ्याची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता. मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे. पण देवेंद्र फडणवीसांकडे CM Devendra Fadnavis गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असं ते म्हणाले.

Harshawardhan Sapkal : काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले आहे. आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात पोलीस स्टेट आणण्याचा प्रयत्न आहे असल्याचा आरोप त्यांनी केला.

Harshawardhan Sapkal : कोरटकर पळून गेला, आता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा !

‘एका विनोदी कलाकाराने राजकीय नेत्यावर काही विनोद केला तर त्याचा मोठ्या मनाने स्विकार करायला हवा. त्याकडे एक विनोद म्हणूनच पहायला हवे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. मनमोहनसिंह तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरही अत्यंत जहरी विनोद केले गेले. पण त्यासाठी कलाकार वा कोणा प्रेक्षकांना अशा पद्धतीने वेठीस धरले नाही. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसतानाही त्यांच्या पक्षाने तोडफोड करणे, कामराला धमकी देणे असे प्रकार सुरु आहेत, अशी टीका त्यांनी केली.