That’s it.. now Devendra Fadnavis should resign : महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे
Mumbai : महाराष्ट्रामध्ये महिलांची छेडखानी आणि अत्याचार होण्याच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती भाजप-महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे संपली आहे. महायुतीने राज्यात जंगलराज आणले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली. सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारी ही घटना आहे. खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणा-यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून होत्या. ही वेळ एखाद्या केंद्रीय राज्यमंत्र्यावर यावी, हे दुर्दैवी आहे, असे सपकाळ म्हणाले.
Harshawardhan Sapkal : सपकाळांची नियुक्ती, काँग्रेस नेत्याचा सर्व पदांचा राजीनामा
गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल, याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही.
Harshawardhan Sapkal : सुभाष चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता हरपला
सुरक्षारक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. राज्यात माता भगीणी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदीचा राजीनामा देऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.