Breaking

Harshwardhan Sapkal : भाजप म्हणजे ‘मुह में राम आणि बगल में छुरी’!

BJP’s role is always two-faced : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सेवाग्राममधून टीका; संगम शिबिराला भेट

Wardha महायुती सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलीकडेच सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची रस्सीखेच नाही. आम्ही सोबत निवडणुका लढलोय. विधिमंडळातील नेते आपसात चर्चा करून लवकरच तोडगा काढतील. पण भाजपची भूमिका कायम ‘मुह में राम आणि बगल में छुरी’ अशी असते, अशी टीका सपकाळ यांनी केली.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते सेवाग्राम आश्रमात आले. त्यांनी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा आणि सचिव विजय तांबे यांच्याशी संवाद साधला. सेवाग्राम येथील संगम शिबिराला भेट देण्यासाठी ते आले होते. सरकारने सत्तेत येत असताना केलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजे. कर्जमाफी, शेतमालाला वाजवी दर, मिळाला पाहिजे. उद्योगपतींचं चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले. कापसाला भाव नाही, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.

PM Kisan Samman Nidhi : सायबर चोरांची बोहारी नजर बळीराजावर

मी बापूंच्या मार्गावर
मी सातत्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आलो आहे. त्यामुळे सेवाग्राम, पवनार, गागोदे ही ठिकाणे माझ्या घरासारखी आहेत. येथे माझे नेहमीच येणे होते. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर प्रथमच सेवाग्राम येथे येऊन पूज्य बापूंच्या विचारांची प्रेरणा घेऊन राज्यभर काँग्रेस पक्षाचा आणि बापूंचा विचार घेऊन जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Dhananjay Munde, Manikrao Kokate : ‘महायुतीचे दोन गुंडे, कोकाटे-मुंडे’!

नागपूरचा कोणी माणूस इतिहास संशोधकांना शिवीगाळ करतो. शिवीगाळ करताना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करतो. त्यांचा अपमान करतो. पोलीस त्याला सुरक्षा देतात. पोलीस समोरच्या दारात उभे राहतात आणि मागच्या दाराने त्याला पसार होऊ देतात. संभाजी महाराज, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्या अभिनेत्यालाही सुरक्षा दिली जाते, हे दुर्दैवी आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.