Chief Minister fooled the people by promising to reduce electricity bills : सपकाळांचा सवाल, वीज बील कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले?
Mumbai भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिलपासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी २८ मार्च रोजी केली. पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज नियामक आयोगात याचिका दाखल करून दर कपातीला स्थगिती मिळवण्यात आली. हा संपूर्ण प्रकार जनतेला एप्रिल फुल करण्याचा आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील वीजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. महागाईने डोके वर काढले असताना महागड्या वीज बिलाचे चटके जनता सहन करत आहे. तर स्मार्ट मीटर बसवून जनतेच्या डोक्यावर अधिकचा भार टाकला जात आहे. स्मार्ट मीटरचे वीज बील ३० ते ४० % अधिक आहे. वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तीन दिवसातच महावितारणला पुढे करून निर्णयाला स्थगिती आणली. हा जनतेचा विश्वासघात आहे. नेहमीप्रमाणे वीज बिल कमी करण्याची घोषणाही जुमलाच होता, असंही ते म्हणाले आहेत.
Vijay Wadettiwar : बीडमध्ये चोरट्यांचा कहर, चक्क गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल फोन चोरला !
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
भाजपा युतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत कुठलीही आर्थिक तयारी न करता आश्वासनांची खैरात वाटली. शेतमालाला हमीभाव, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहिणीला २१०० रुपये देणाच्या वल्गना केल्या. पण सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा बदलली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत असे सांगत ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणा करा, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
Mangeshkar Hospital : चौकशी समितीचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका !
पैशाचे सोंग करता येत नाही, हे माहित होते तर आश्वासनांची खैरात करताना ते कळाले नाही का? असा संतप्त सवाल करून, ही जनतेची क्रूर थट्टा आहे असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.








