Congress claims to reduce Mahindi-Marathi conflict in Mira Bhayandar : हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्याचा दावा
Mumbai मीरा भाईंदरमध्ये हिंदी-मराठी Hindi-Marathi conflict वादाची पडलेली ठिणगी राजकीय पक्षांना आकर्षित करणारी ठरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी या भागाचा दौरा केला. आता काँग्रेसचीही पावलं त्या दिशेनं वळली आहेत. हिंदी-मराठी भाषिकांमध्ये वाढलेला तणाव चर्चासत्राच्या माध्यमातून कमी करण्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
भाषेच्या वादावरून समाजात वितुष्ट निर्माण करण्यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यातून कोणाला राजकीय फायदा होतो, हे सर्वांना माहित आहे. परंतु असा तणाव निर्माण होणे समाजाच्या हिताचे नाही. म्हणून काँग्रेसने पुढाकार घेत मीरा भाईंदरमध्ये मंगळवार, दि. 15 जुलैला ‘आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा’ चर्चासत्र आयोजित केले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते गणेश पाटील यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचीही यावेळी उपस्थिती असेल.
Harshvardhan Sapkal : काँग्रेस करणार जनसुरक्षा कायद्याची होळी!
मुंबई आणि महाराष्ट्रात देशाच्या सर्वच भागातून नोकरी, व्यवसाच्या निमित्ताने आलेले लोक एकत्र राहतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आपले स्वप्न साकारण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबई व परिसरात येत आहेत. या शहराने नेहमीच या सर्वांना सामावून घेतले आहे. विविधतेत एकता ही आपली ओळख आहे. पण ही ओळख पुसण्याचे काम काही लोक करत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबेसारखे राज्याबाहेरील नेते प्रक्षोभक विधाने करून या वादाला खतपाणी घालत आहेत, असा आरोपही काँग्रेसने केला.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होत आहेत. या निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी हा वाद निर्माण केला जात आहे. याचा फायदा कोणाला होतो हे सर्वश्रुत आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वांनी एकोप्याने बंधु भावाने रहावे यासाठीचा प्रयत्न म्हणून काँग्रेसने हे आयोजन केले आहे. मीरा रोडच्या नयानगर येथील अस्मिता क्लब येथे दुपारी 2.30 वाजता हा कार्यक्रम होईल, असेही सांगण्यात आले.