Breaking

Harshwardhan Sapkal : अचानक युद्धबंदी जाहीर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण?

Congress holds tractor march and Tiranga Rally in Amravati : सपकाळ यांचा सवाल, काँग्रेसतर्फे अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चा व तिरंगा रॅली

Amravati देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वात अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चा व तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांची उपस्थिती होती.

Devendra Fadnavis : निविष्ठा विक्रीत लिंकिंग आढळल्यास गुन्हे दाखल होतील

सपकाळ म्हणाले, ‘आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहेत. देशाच्या सीमेवर जवानांनी आपल्या शौर्याची पराकाष्ठा करत पाकिस्तानला धडा शिकवला. याबद्दल सर्वांना अभिमान आहे. पण इकडे राज्यातील शेतकरी मात्र संकटात आहे, सरकारचे त्याकडे लक्ष नाही. कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करत असतात.’

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर १२ हजार रुपयावरून ६ हजार रुपये झाली आहे. कारण शेतकऱ्याची तूर बाजारात येत असताना केंद्रातील भाजप सरकारने तूर आयात करून भाव पाडले. सोयाबीन ४ हजार रुपयांच्या वर जात नाही, शेतमालाला भाव नाही. पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला सावकारच्या दारात उभे रहावे लागत आहे. या परिस्थितीला फडणवीसांचे सुलतानी सरकार जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केला.

Nagpur Municipal Corporation : महापालिका म्हणते नागपुरात एवढे खड्डे, लोक म्हणतात कमीच सांगितले!

काँग्रेसच्या आजच्या ट्रॅक्टर रॅलीने आंधळ्या, बहिऱ्या सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे. पण सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली आणि शेतमालाला योग्य भाव दिला नाही तर हा लढा आणखी तीव्र करू. त्यानंतर जो परिणाम होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.