Breaking

Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांच्या वेदनेचे फक्त सांत्वन नको, ठोस आधार द्या

Congress offers urgent help after farmer couple commits suicide : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आवाहन; शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर काँग्रेसकडून तातडीची मदत

Chikhali हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे नुकसान आणि कर्जबाजारीपणाच्या ताणामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचललेल्या भरोसा येथील थुट्टे शेतकरी दाम्पत्याच्या कुटुंबीयांची भेट घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी सरकारला थेट इशारा दिला – “शेतकऱ्यांच्या व्यथेला आता सहवेदना पुरेशी नाहीत, आता ठोस कृती हवी!”

थुट्टे दाम्पत्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण विदर्भ हादरला आहे. ही घटना म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी संकटाचे विदारक उदाहरण असून राज्य सरकारच्या असंवेदनशील धोरणांचे हे दुर्दैवी फलित असल्याची टीका सपकाळ यांनी केली.

Minister of Agriculture : मला कृषीखात्याची ‘ऑफर’ होती, पण मी नकार दिला

भरोसा येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह सपकाळ यांनी मृतकांचा मुलगा नागेश थुट्टे आणि सून शितल थुट्टे यांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. या प्रसंगी त्यांनी सांगितले की, “राज्यातील शेतकरी अडचणीत असताना सरकार मदतीसाठी पुढे यायला तयार नाही. काँग्रेस मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”

Maharashtra politics : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही

दुःखद घटनेनंतर काँग्रेसने तातडीने ₹५१,००० ची मदत जाहीर केली. या मदतीत माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी सभापती अशोकराव पडघान, चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. ही रक्कम थुट्टे कुटुंबाला लवकरच सुपूर्द केली जाणार आहे. “फक्त टोकाच्या पावलांनीच नाही, तर या देशाचा अन्नदाता दिवसेंदिवस संपत चाललाय. पिकवायचं त्याने, मरायचंही त्याने? सरकारने आता कृतीद्वारे दाखवावं की त्यांना शेतकऱ्यांची वेदना समजते,” असा रोखठोक सवाल सपकाळ यांनी सरकारला केला.