Breaking

Harshwardhan Sapkal : भाजपपाठोपाठ काँग्रेसचीही तिरंगा यात्रा, राज्यभर आयोजन

Congress’s Tiranga Yatra on May 21 : प्रदेशाध्यक्षांची माहिती, शेतकऱ्यांना मदत करण्याचीही मागणी

Mumbai भारतीय जवानांनी पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर सत्ताधारी भाजपने राज्यभर तिरंगा यात्रा काढली. जवानांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊनही भारतीय लष्कराचे आभार मानले. काँग्रेसने देखील आता तिरंगा यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसही भारतीय लष्कराचे आभार मानणार आहे. २१ मे रोजी राज्यभर ही यात्रा निघणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी आपल्या शौर्याने देदिप्यमान कामगिरी केली आहे. आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावणाऱ्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीला, २१ मे राजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत तिरंगा यात्रा काढणार आहे,’ अशी माहिती सपकाळ यांनी दिली.

Youth Congress : युवक काँग्रेसकडे बॅनर, पोस्टरचेही पैसे नाहीत!

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रश्नही मांडले. राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीत्यांनी केली.

ते म्हणाले, ‘१ रुपयात पीक विमा योजना सरकारने बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. पीक कापणीवर आधारीत नवी विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नाही. पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही. या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून योजना राबवली पाहिजे.’

Eknath Sinde Shiv Sena : काल पक्षात आले, आज कार्याध्यक्ष झाले!

खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. बि बियाणे, खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे पण सरकारच्या कृषी विभागाची काहीच तयारी दिसत नाही. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतक-यांची फसवणूक करत आहेत. राज्यभर बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला.