व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Sign in
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • प्रशासकीय
  • संपादकीय
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Privacy Policy
Password recovery
Recover your password
Search
  • Sign in / Join
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Privacy Policy
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Sattavedh
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • प्रशासकीय
  • संपादकीय
Home राजकारण Harshwardhan Sapkal social media post impact : सपकाळांच्या त्या एका ‘पोस्ट’ने महाविकास...
  • राजकारण

Harshwardhan Sapkal social media post impact : सपकाळांच्या त्या एका ‘पोस्ट’ने महाविकास आघाडीत खळबळ; काँग्रेस-उद्धवसेनेत ठिणगी

February 11, 2026
  • Team Sattavedh

mehkar-congress-vs-shivsena-ubt-tensions : ‘चंद्रपूर पॅटर्न’चे बुलढाण्यात पडसाद; अतिक्रमणधारकांच्या घरांवरून सत्तेच्या सोबत्यांमध्येच जुंपली

Mehkar चंद्रपूर महानगरपालिकेत उद्धवसेनेने भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये उमटू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या “आम्ही आता वेगळा विचार करायचा का?” या सूचक विधानाने महाविकास आघाडीत तणाव निर्माण केला असून, मेहकर नगरपालिकेत काँग्रेस आणि उद्धवसेनेचे संबंध टोकाला पोहोचले आहेत.

चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेने काँग्रेसला डावलून भाजपला साथ दिल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी समाजमाध्यमांवर टाकलेली पोस्ट म्हणजे उद्धवसेनेला दिलेला थेट इशारा मानला जात आहे. बुलढाणा हा सपकाळांचा बालेकिल्ला असल्याने, मेहकरमधील काँग्रेस नेते आता आक्रमक झाले असून त्यांनी स्थानिक पातळीवर उद्धवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

Rohit pawar : अजितदादांचा घातपात की अपघात? पायलट बदल, मेंटेनन्स अहवालावर संशय

मेहकर नगरपालिकेत उद्धवसेनेचे किशोर गारोळे नगराध्यक्ष आहेत, तर काँग्रेसचे ११ नगरसेवक सत्तेत भागीदार आहेत. मात्र, आता शहरातील अतिक्रमणधारकांच्या हक्काच्या घरांच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत श्रेयवादाची लढाई पेटली आहे. काँग्रेसचे गटनेते आणि माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी आक्रमक पवित्रा घेत, अतिक्रमणधारकांना घरे देण्याचा पाठपुरावा आपण नगराध्यक्ष असतानाच सुरू केला होता, असे ठणकावून सांगितले आहे. नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी हा विषय लावून धरला असला तरी, कासम गवळी यांनी अचानक या विषयावर जोर दिल्याने उद्धवसेनेवर राजकीय दबाव वाढला आहे.

Chandrapur municipal corporation : चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा गेम, हर्षवर्धन सपकाळ भडकले; आता परभणीत बदला घेणार?

वरकरणी स्थानिक वाटणारा हा प्रश्न आता थेट प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेशी जोडला जात आहे. चंद्रपूरमध्ये जो ‘धोका’ काँग्रेसला मिळाला, तसाच काहीसा प्रकार मेहकरमध्ये घडू नये म्हणून काँग्रेसने आतापासूनच आक्रमक रणनीती अवलंबली आहे. सपकाळांच्या सूचनेनुसार मेहकरमधील काँग्रेस नगरसेवक आता उद्धवसेनेला धारेवर धरत असल्याने महाविकास आघाडीतील दरी वाढताना दिसत आहे.

  • TAGS
  • Harshwardhan Sapkal social media post impact
  • Mehkar
Team Sattavedh

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Census 2026 : जनगणनेच्या ३३ प्रश्नांत ‘ओबीसी’ गायब! राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संताप; केंद्र सरकारविरोधात एल्गार

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरच्या आखाड्यात मुनगंटीवारांचा ‘मुरब्बी’ डाव!

Akola Municipal Corporation : भाजप या नेत्यांना पाठवणार महापालिका सभागृहात

ताज्या बातम्या

social media india : Deepfake आणि AI कंटेंटवर सरकारची कडक कारवाई

Team Sattavedh - February 11, 2026 0
deepfake-ai-content-new-it-rules-social-media-india : सोशल मीडियासाठी नवीन आयटी नियम अधिसूचित New Delhi : Deepfake आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या बनावट कंटेंटवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा...

Census 2026 : जनगणनेच्या ३३ प्रश्नांत ‘ओबीसी’ गायब! राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संताप; केंद्र सरकारविरोधात...

Team Sattavedh - February 11, 2026 0
obc-federation-protest-census-2026-questionnaire-caste-based-census-demand : जातनिहाय जनगणनेच्या आश्वासनाला हरताळ फासल्याचा आरोप; २३ मार्चला दिल्लीतील जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलन Amravati केंद्र सरकारने २२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केलेली जनगणनेची नवी...

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरच्या आखाड्यात मुनगंटीवारांचा ‘मुरब्बी’ डाव!

Team Sattavedh - February 11, 2026 0
sudhir-mungantiwar-chandrapur-corporation-victory-strategy-analysis-2026 : बंडाळी आणि बाह्य आव्हाने असूनही भाजपचाच भगवा फडकला Chandrapur राजकारणाच्या आखाड्यात अनेकदा चितपट होणारी परिस्थिती समोर असताना, एखादा अनुभवी खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या हातालाही लागू...

Akola Municipal Corporation : भाजप या नेत्यांना पाठवणार महापालिका सभागृहात

Team Sattavedh - February 11, 2026 0
Names of BJP’s nominated members finalised : स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित, विरोधी पक्षांचा नावावर काथ्याकूट सुरूच Akola महापालिका निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदांवर वर्चस्व प्रस्थापित...

Ravindra Chavhan : भाजपची मोठी कारवाई; 69 बंडखोर कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित

Team Sattavedh - February 11, 2026 0
pune-bjp-69-rebels-suspended-six-years-amol-balwadkar : पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढणे लढणे भोवले Pune : पुण्यातील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवणारी कारवाई भारतीय जनता पक्षाने केली असून, पक्षाच्या अधिकृत...
‘सत्तावेध’ हे महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकारण, प्रशासन यावर सत्य, परखड आणि निर्भीड वृत्तांकन तसेच विश्लेषणाचे एकमेव व दर्जेदार व्यासपीठ होय. ‘सत्ता, संघर्ष आणि सत्य’ याचा सखोल मागोवा घेऊन ताज्या, पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि निःपक्ष बातम्यांमधून वाचकांशी विश्वासाचे नाते तयार करणारे डिजीटल न्यूज पोर्टल म्हणून ‘सत्तावेध’ ओळखले जाते. राजकारण, प्रशासन अन् देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे वस्तुनिष्ठ अपडेट्स देणे, हाच ‘सत्तावेध’चा उद्देश आहे.

रक्षा भोयर

व्यवस्थापकीय संपादक (Managing Editor)

संपर्क क्रमांक - 92840 02429
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
  • Contact Us
© Powered by ContentOcean Infotech Private Limited.
error: Content is protected !!