Harshwardhan Sapkal : सपकाळांच्या बाबतीत भाजपचे मौन का?

 

Why Buldhana BJP is on silent mode : बुलढाण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका संशयास्पद

Buldhana कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कठोर शब्दांत वक्तव्य केले होते. गायकवाडांनी फडणवीस यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानावर भाजपाच्या जिल्हा नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यावेळी जळगाव जामोद आणि बुलढाण्यात गायकवाडांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले होते.

मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यकारभाराची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर राज्यभर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणीही सपकाळांच्या वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सपकाळांच्या वक्तव्याची माफी मागण्याची मागणी केली. तरीसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांनी सपकाळांविरोधात मौन बाळगले आहे, हे आश्चर्यकारक आहे.

Harshawardhan Sapkal : शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं ?

संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देणारी भाजपा, सपकाळांच्या वक्तव्याच्या बाबतीत शांत का आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सपकाळांच्या वक्तव्याने फडणवीस यांचा अपमान झाला असला तरी, बुलढाणा जिल्ह्यातील भाजपने सपकाळांविरोधात आंदोलन करण्याचे टाळले.

विशेष म्हणजे, शिवसेनेचे असूनही संजय गायकवाड यांनी सपकाळांच्या वक्तव्यावर प्रखर टीका केली. सपकाळांच्या विधानावर बोलताना त्यांनी कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला. सपकाळांचे विधान हे फडणवीसांसह महाराष्ट्राच्या जनतेचाही अपमान असल्याचे म्हटले.

Harshawardhan Sapkal : धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?

भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाच्या या शांततेमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. गायकवाडांच्या प्रकरणात उग्र प्रतिक्रिया देणारे नेते, सपकाळांच्या विधानावर मात्र मौन बाळगत आहेत. भाजपाचा हा विरोधाभास पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. बुलढाणा जिल्ह्यातील भाजपाच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.