Why didn’t women become Sarsanghchalaks in RSS? : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी संघाला डिवचले; संघाला स्त्री-पुरुष समानता मान्य नसल्याचा आरोप
Beed Neknur समतेचा व स्त्री पुरुष समानतेचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही. आजपर्यंत एकही महिला सरसंघचालक पदावर का नियुक्त झाली नाही. महिलांना एक वस्तू मानणारी ही प्रवृत्ती आहे. राज्यात आज याच विचाराच्या लोकांनी खेळ मांडला आहे, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मस्साजोग येथून सकाळी सुरु झालेली सद्भावना पदयात्रा २३ किमीचा प्रवास करून नेकनूर येथे पोहोचली. यात्रेचा पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला. ‘बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्त्रीभृणहत्या होत आहे. हे चिंताजनक आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेचा संदेश घेऊन पुढे जावे लागणार आहे,’ असंते म्हणाले.
CM Devendra Fadnavis : ‘एआय अनझीप्ड’ पुस्तकामुळे कार्यक्षमता वाढेल
मनुवादी विचार सरणीमुळे स्त्री-भृण हत्यांचे प्रकार वाढले आहेत. मनुवादी विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम केले, त्यांची गाथा पाण्यात बिडवली. संत ज्ञानेश्वरांनी गीता सोप्या भाषेत लिहिली, त्यांना त्रास दिला. बहुजन समाजाच्या प्रगतीत या विचाराने विरोध केला. सावित्रिबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या. त्याला विरोध करत फुले दांम्पत्यांना शेणाचे गोळे व दगड मारणारा विचार हाच होता, अशी टीकाही त्यांनी केला.
CM Devendra Fadnavis : डीप फेक आणि मॉर्फिंग रोखण्यासाठी विशेष नियोजन!
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकडोजी महाराज यांचा विचार हा ‘आयडिया ऑफ इंडिया’ Idea of India आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपाच्या राज्यात मोकाट आहेत, त्यांना सरकार संरक्षण देत आहे. पुरस्कार देऊन गौरव करत आहे. समाजासमाजात भांडणे लावणे हा भाजपचा विचार आहे. पण आपल्याला पुरोगामी विचाराने पुढे जावे लागणार आहे. समाजातील विषमता दुर करण्यासाठी सद्भावना यात्रा काढण्यात आली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.