Breaking

Hasan Mushrif : वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचे हस्तांतरण लवकरच

 

Transfer of land for medical college at Hinganghat soon : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; हिंगणघाटच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक

Wardha हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना आढावा बैठक घेण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जागेच्या हस्तांतरणासह इतरही प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.

या बैठकीला प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग धीरजकुमार, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन नागपूर राजू निवतकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालयाचे संचालक, आयुक्त, उपसचिव, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालय बांधकाम, जागा हस्तांतरण या मुख्य विषयांवर चर्चा केली.

Election Commission of India : निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना आमंत्रण !

जागा हस्तांतरणबाबत कृषी विभागाकडून फाईल प्राप्त झाली आहे. येत्या काही दिवसांत जागेचे हस्तांतरण होईल, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाज सुरळीत होण्यासाठी नियमित प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची बाब बैठकीत उपस्थित करताच यावरसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत सूचना केल्या.

बँकेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे खाते तातडीने उघडण्यात यावे. महाविद्यालय निर्मितीकरिता डीपीआर तयार करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या. या वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही. तातडीने सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी दिल्यात.

Hasan Mushrif : मुश्रिफांना विश्वास, राज्य होईल Medical tourism centre !

आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैद्यकीय महाविद्यालयासोबतच कॅन्सर रुग्णालयाची मान्यता देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत नवीन कॅन्सर रुग्ण विभाग सुरू करण्याचेही मंत्री महोदयांनी मान्य केले.