Hatta Grampanchayat : महिला सरपंचाला शिवीगाळ; राजकारण तापले!

Buldhana

Woman sarpanch was abused :शिपायासह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Beed जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यभरात असंतोष असतानाच लाेणार Lonar तालुक्यातील हत्ता येथील महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या संतापजनक घटनेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी बिबी पाेलिसांनी ग्रामपंचायतच्या शिपायासह आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हत्ता येथील सरपंच विनता प्रमाेद जुमडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या 30 डिसेंबर राेजी मासिक सभेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित हाेत्या. या बैठकीत ग्रामपंचायत शिपाई गजानन रामप्रसाद अढाव हे सतत गैरहजर राहत असल्याने बिडीओच्या नाेटीसच्या अनुषंगाने विषय घेण्यात आला. त्यामुळे गजानन आढाव यांनी कार्यालयाचे दार लावून घेतले. तसेच सरपंच जुमडे यांना जातीवाचक शिवीगाळ केली व चापटा बुक्यांनी मारहाण केली़.

रामप्रसाद गाेविंदा आढाव, उषा गजान आढाव, राधा रामप्रसाद आढाव, विजय रामप्रसाद आढाव, संजय वसंता आढाव, शशीकला वसंता आढाव, गणेश विजय आढाव यांनीही जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी बिबी पाेलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेकडे जातीय आणि राजकीय अंगाने बघितले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी गांभिर्याने तपास करावा, अशी मागणी होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या घटनेकडे गांभिर्याने बघितले जात आहे.

जिल्ह्यातील राजकारण तापले
एका महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उघडकीस येताच जिल्ह्यात राजकारण तापले आहे. आराेप प्रत्याराेपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आराेपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील सरपंचांच्या हत्येनंतर ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आराेपीविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पाेलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.