Shiv Sena Renames Sub-District Hospital as ‘Refer to Buldhana Hospital’ : डॉक्टरांच्या गैरहजेरीवर संताप; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास ‘ताला ठोको’चा इशारा
Malkapur येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. “रेफर टू बुलढाणा रुग्णालय” अशी नामफलक फडकावत शिवसेनेने प्रतीकात्मक आंदोलन छेडले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रुग्णालयाची परिस्थिती आठ दिवसांत सुधारली नाही, तर तोडफोड करून रुग्णालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल, असा कठोर इशारा यावेळी देण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालयात अनेकदा डिलिव्हरीसाठी येणाऱ्या महिलांना स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसल्याचा अनुभव वारंवार येत आहे. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता दोन गर्भवती महिला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या; मात्र त्या वेळी स्त्रीरोग तज्ञ अनुपस्थित असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना संपर्क साधला. दोन तास उलटूनही डॉक्टर न आल्याने संताप निर्माण झाला.
Local Body Elections : कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र! नव्या आघाडीच्या चर्चांना वेग
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी रुग्णालयात धाव घेत अधीक्षक डॉ. राजेश उंबरकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ. क्षिरसागर उपस्थित झाले आणि त्यांनी रुग्णाला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, खाजगी रुग्णालयात उपचार केल्यावर सिझेरियन डिलिव्हरी करण्यात आली आणि रुग्णाला तब्बल ₹३० हजारांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
Mahayuti Government : ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाला ‘लोगो’!
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व सोनोग्राफी तज्ञांची नियुक्ती करण्यात यावी.
रक्तपेढी त्वरित सुरू करून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करावी.
नियमित डॉक्टर उपस्थिती सुनिश्चित करावी.
बिघाड झालेल्या यंत्रसामग्रीचे दुरुस्ती व कार्यान्वयन तात्काळ करावे.








