Aryan Khan and Raj Kundra in Sanjay Raut’s book : २१ दिवस काय केले, सांगितली अंदर की बात
Mumbai : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे १०० दिवसांपेक्षा अधिक काळ आर्थर रोड जेलमध्ये होते. पत्रा चाळ प्रकरणी त्यांना अटक झाली होती. तेथील अनुभवावर त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहीलं. काही दिवसांपूर्वीच या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पण प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक कमालीचं चर्चेत आले. कारण संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे या पुस्तकात केले आहेत आणि अनेक प्रसंगांचं वर्णनही केलं आहे. सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याने जेलमध्ये २१ दिवस कसे काढले, याचेही वर्णन पुस्तकात केले आहे.
संजय राऊत जेलमध्ये असताना आर्यन खानसुद्धा त्याच जेलमध्ये होता कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरणात आर्यन आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली होती. जवळपास २१ दिवस तो जेलमध्ये होता. आर्यन आणि त्याचे मित्र राऊतांच्याच यार्डात होते. आर्यनने कुठल्याही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नव्हतं आणि त्याच्याकडे अंमली पदार्थ सापडलेही नाहीत. पण कुणीतरी नाहक बदनामी करण्यासाठी ही अटक घडवून आणली होती. पैशांसाठीही अशा अटका घडवून आणल्या जातात, असं राऊत यांनी पुस्तकात लिहिलं आहे.
Central Judicial Authority : पोलीस अधिक्षकांची बदली हा मनमानी कारभार!
जेलमध्ये असताना आर्यन काही खात नव्हता. तो कुणाशी बोलतही नव्हता. फळं खाऊन आणि पाणी पिऊन त्यांने जेलमध्ये दिवसं काढले. एक दिवस राऊतांच्या यार्डातील सहाय्यक इंपोर्टेड ब्रॅंडेड टी शर्ट घालू समोर आला. मी त्याला म्हटलं, ‘ये तो एकदम भारी टी शर्ट है..’ त्यावर त्याने उत्तर दिलं की, ‘हां साब, दस नंबर मे आर्यन खान के साथ था, जाते वक्त उसने मुझे अपना टी शर्ट दिया’, असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. राज कुंद्रा हा सु्द्धा त्याच काळात ऑर्थर रोड जेलमध्ये होता. शंभर – सव्वाशे कैद्यांसोबत त्याला जनरल यार्डात ठेवले होते, असेही पुस्तकात लिहीले आहे.