MNS leader Sandeep Deshpande’s venomous criticism of Shiv Sena leader Sanjay Raut : १६००० मनसैनिकांवर कारवाई झाली होती, तेव्हा राऊतांना मैत्री का नाही आठवली?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी लिहीलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात त्यांनी अनेक स्फोटक दावे केले आहेत. त्यानंतर सध्याच्या ढगाळ वातावरणात आणि मुसळधार पावसात राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. महायुतीचे नेते राऊतांचे दावे खोडून काढण्याच्या भानगडीत न पडता केवळ टोलेबाजी करत आहेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे.
‘राज ठाकरे आपले मित्र आहेत. तुरंगात होतो तेव्हा त्यांनी एकदा फोन करायला पाहिजे होता’, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा संदीप देशपांडे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. यावर बोलताना देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे कधीच म्हणत नाहीत की, संजय राऊत माझे मित्र आहेत. मान ना मान, मै तेरा मेहमान, अशी गत संजय राऊतांची झालेली आहे.
Heaven in Hell : मला अटक करण्यापूर्वी माझ्या मित्रांना त्रास दिला, राऊतांचा दावा !
संजय राऊत यांना भाजप नेत्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांबाबतही काही गंभीर बाबी पुस्तकात नमूद केल्या आहेत. दरम्यान संदीप देशपांडे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे. संजय राऊत पाकिस्तानसारखेच आहेत. दोघेही व्हिक्टीम कार्ड खेळतात, असे म्हणत राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. वाईट काळात राऊतांना राज ठाकरेंची आठवण आली. पण जेव्हा आमच्या १६००० मनसैनिकांवर कारवाई झाली होती, तेव्हा राऊतांना मैत्री का नाही आठवली, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
Education : मुस्लीम आहे म्हणून मुलीला प्रवेश नाकारला, सचिव, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल !
आर्थिक घोटाळा केल्यामुळे संजय राऊतांना अटक झाली होती. पत्रा चाळ संदर्भात त्यांच्यावर आरोप झाले होते. त्याबद्दल त्यांनी पुस्तकात काहीही लिहीलेलं नाही. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण त्यांच्यावरही राऊतांनी लिहीलं आहे. पण ते पाहायला कोण होतं, हा प्रश्न मात्र कायमच राहतो, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.