Breaking

Heaven in Hell : अमित शाह यांच्यावरील आरोपानंतर नवी खळबळ !

New stir after Shiv Sena leader Sanjay Raut’s allegations against BJP leader Amit Shah : २०१४ नंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला

Mumbai : खासदार संजय राऊत हे रोजच मिडियामध्ये चर्चेत असतात. सकाळचा भोंगा म्हणून विरोधक त्यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. पण कालपासून ते पुन्हा चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे. या पुस्तकात त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांबाबत खळबळजनक दावे केले आहेत. आता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपामुळे नवी खळबळ उडाली आहे.

आपल्या पुस्तकात राऊत यांनी भाजप आणि शिवसेना युती तुटण्यामागील कारणे नमूद केली आहेत. हे मांडतांना त्यांनी केलेल्या आरोपांमुळे नवाच वाद निर्माण होण्याची शक्तया निर्माण झाली आहे. पुस्तकाबाबत बोलताना राऊत यांनी अमित शाह यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. गेल्या १० वर्षांत म्हणजे २०१४ नंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. शेवटी २०१९मध्ये २५ वर्ष जुनी मैत्री तुटली. याला पूर्णपणे अमित शाह जबाबदार आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.

Heaven in Hell : संजय राऊतांची गत म्हणजे ‘मान ना मान, मै तेरा मेहमान’ !

गेल्या १० वर्षांत राजकारण वेगाने बदलले आणि भाजप – शिवसेनेतील दरी मोठी होत गेली. खरे पाहता अमित शाह दिल्लीत आल्यानंतर या प्रक्रियेला सुरूवात झाली. २५ वर्ष जुनी मैत्री तोडण्यात अमित शाह यांचाच हात आहे. शाह यांनी जेव्हा युती तोडण्याच्या हालचाली सुरू केल्या, तेव्हा अरुण जेटली यांनी त्यांना समजावलं होतं. शिवसेना आपला फार जुना मित्र पक्ष आहे, असे करू नका, जेटलींनी शाह यांनी सांगितलं होते. पण शाह काही मानले नाहीत आणि युती तोडूनच दम घेतला, असं राऊत म्हणाले.

Heaven in Hell : मला अटक करण्यापूर्वी माझ्या मित्रांना त्रास दिला, राऊतांचा दावा !

२०१४ मध्ये जेटली आजारी होते. एकदा अरुण जेटलींनी मलाही सांगितलं होतं की, मी शाह यांना दोन वेळा समजावून सांगितलं. शिवसेना आपला जुना मित्र आहे, त्यांच्यासोबत आपल्याला रहावं लागेल. पण त्यांनी ऐकलं नाही, असं जेटलींनी तेव्हा म्हटल्याचेही संजय राऊत यांनी आज माध्यमांना सांगितले.