Kamljā Mata Temple surrounded by water : मंदिराकडे जाणाऱ्या पारंपरिक वाटा बंद, खडतर मार्गाने प्रवास
Lonar लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिराला वाढत्या जलपातळीचा वेढा पडला आहे. मंदिराचा ओटा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून मुख्य उंबरठ्यालाही पाणी लागले आहे. खालून झरे फुटल्याने गाभाऱ्यात पाणी शिरले आहे. त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या पारंपरिक वाटा बंद झाल्या आहेत. मात्र वरच्या बाजूने असलेल्या गुप्त मार्गाला वन्यजीव विभागाने खुला केल्याने भाविक खडतर आणि निसरड्या वाटेने दर्शनासाठी गर्दी करत आहेत. महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वच भक्त देवीची आराधना करण्यासाठी धाडसाने मंदिरात पोहोचत आहेत.
गेल्या काही वर्षांत सरोवराची पाणी पातळी सातत्याने वाढत असून २०२० मध्ये ३८ मीटरपर्यंत आटलेले पाणी नंतर सततच्या अतिवृष्टीमुळे पुन्हा वाढले. विराज धारतीर्थ, पापहारेश्वर, सीता न्हाणी या ठिकाणांवरून तसेच डोंगरातून झरे फुटल्याने सरोवरात पाणी येत आहे. त्यामुळे महादेवाची विविध मंदिरे आधीच पाण्याखाली गेली असून आता कमळजा माता मंदिरही त्याच संकटाला सामोरे जात आहे.
नवरात्रोत्सव काळातही भक्तांची श्रद्धा कमी झालेली नाही. निसरडा रस्ता, पडण्याचा धोका असूनही संकट निवारणासाठी देवीचा आशीर्वाद मिळावा या भावनेतून भाविक दररोज मंदिर गाठत आहेत.
Vidarbha Farmers : कर्जमाफी नाही; तरीही ७० टक्के शेतकऱ्यांनी केली परतफेड
“आमच्या बालपणापासून सरोवर पाहतोय, पण मंदिराला पाण्याचा वेढा पडलेला पहिल्यांदाच पाहतोय. शासनाने तातडीने उपाययोजना करून हा अनमोल ठेवा वाचवावा,” अशी मागणी स्थानिक रहिवासी गजानन इरतकर यांनी केली.