More heavy rain in the next few hours: Eknath Shinde’s instructions to the Collectors and Municipal Commissioners : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू
Nagpur : राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजिवन विस्कळीत होऊ नये, तसेच जिवित किंवा वित्त हानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे. पाऊन सुरू असलेल्या जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू राहतील. अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक दक्ष राहून काम करावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे, मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून सुचना दिल्या आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडूनही परिस्थितीची माहिती घेतली. पाण्याने तुंबलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा यांवर विशेष लक्ष ठेवावे. मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींसदर्भात विशेष काळजी घ्यावी. मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक कशी सुरळीत राहिल, याचीही काळजी घेण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
Buldhana administration : स्मशानभूमीची जागा गायब, मुंदेफळ येथील प्रकार
नागरिकांनी हवामान विभागाच्या सुचनेचे पालन करावे. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच सखल भागांत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. प्रशासन लोकांच्या मदतीसाठी तत्पर आहे. त्यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.