1 lakh farmers deprived, only 11 thousand farmers received aid : ठाकरे गट आक्रमक, अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलनाचा इशारा
Akola जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या शेततोडीमुळे प्रचंड नुकसान झाले असून शासनाकडून जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी ठरली आहे. १ लाख २० हजार शेतकऱ्यांचे १ लाख १० हजार हेक्टर शेतीक्षेत्र उद्ध्वस्त झाले, तरी २३ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार फक्त ११ हजार ५९७ शेतकऱ्यांना ६ कोटी २१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या तफावतीमुळे उर्वरित लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख आणि जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे निवेदन सादर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. निवेदनात अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
Prahar Janshakti Party : शेतकऱ्यांचा अंत बघू नका, ओला दुष्काळ जाहीर करा
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टी आणि पुराने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची आवश्यकता आहे. फक्त काहींनाच लाभ देऊन उर्वरितांना बाजूला ठेवणे अन्यायकारक निर्णय असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. पात्र नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळाली नाही तर जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Zilla Parishad : पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा क्लास
जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना राज्य शासनाने फक्त ११ हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. ही बाब इतर पात्र शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून, शासनाने गंभीरपणे विचार करावा; अन्यथा आंदोलनाचा मार्ग खुला आहे असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.