Hundreds of hectares of farmland damaged : शेकडो हेक्टरवरील शेती खरडली, घरांचेही नुकसान
Buldhana जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. विशेषतः मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार व चिखली तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतजमिनी, उभी पिके, विहिरी, गोठे तसेच अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरामुळे गावांमध्ये पाणी शिरले असून शेकडो हेक्टरवरील शेती खरडून गेली आहे. अनेक जनावरे दगावली तर काहींचे संसार उघड्यावर आले आहेत.
या बिकट परिस्थितीत शासनाने पंचनाम्याचा गोंधळ न घालता शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट १००% नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. त्यांनी २० ऑगस्ट रोजी सिंदखेड राजा व चिखली तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.
Jitendra Awhad : भाजपाचा ओबीसी आरक्षणाला विरोध, आव्हाड यांचा आरोप
तुपकर म्हणाले, “आधीच भाव न मिळाल्याने कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर हुमणी अळीच्या हल्ल्यानंतर आता अस्मानी संकट कोसळले आहे. शासनाने बुलढाणा जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करावी. अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल.” सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी गावात २६ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमठाणा (चिखली)सह अनेक गावांत पावसाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तत्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.