Three members of the Jaiswal family from Wani cremated in a mournful atmosphere : डॉक्टरांनी डीएनए तपासणी करून मृतदेहांची ओळख पटवली
Wani – Yavatmal : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जायसवाल कुटुंबातील राजकुमार जायसवाल त्यांची पत्नी श्रद्धा आणि २३ महिन्यांची मुलगी काशी यांचा मृत्यू झाला. या तिघांवरही आज (ता. १८ जून) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने वणी शहरावर शोककळा पसरली आहे.
तिघांचेही मृतदेह आणण्यासाठी कुटुंबीय रुद्रप्रयागला गेले होते. मंगळवारी (ता. १७ जून) सकाळी एअरबसने मृतदेह दिल्लीत आणले गेले. त्यानंतर रात्रीच्या विमानाने मृतदेह नागपुरात आणण्यात आले. आज सकाळी ११ वाजता वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वणी शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. हळहळ व्यक्त करीत साश्रू नयनांनी राजकुमार, त्यांची पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशी हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Sharad Pawar: तर…. ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर आग लागली होती. तिघांचेही मृतदेह पूर्णपणे जळले होते. तेथील डॉक्टरांनी डीएनए तपासणी करून मृतदेहांची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह कुुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रशासनाने मृतदेह जंगल्याच्या बाहेर आणण्याची व्यवस्था केली होती. आधी दिल्ली त्यानंतर नागपुरला मृतदेह आणल्यानंतर नागपूरहून चारचाकी वाहनाने मृतदेह वणीला नेण्यात आले आणि आज सकाळी अंत्यसंस्कार पार पडले.
Monsoon Alart : राज्यात पुढीलं 5 दिवस पावसाचे, काही भागात ऑरेंज ‘अलर्ट’
हवाई प्रवास किती सुरक्षित, असा प्रश्न अहमदाबाद विमानतळावरील विमान अपघात आणि केदारनाथ मधील या हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर पडला आहे. या अपघातांनंतर लोक हवाई प्रवास करण्यास कचरत असल्याचे बघायला मिळत आहे. हवाई कंपन्यांनी सेवेमध्ये दुरूस्त्या करण्याची मागणी जोर धरत आहे. सरकारनेही या कंपन्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.