Help for farmers : शेतकऱ्यांना मदत नाही दिली, तर निवडणुका होऊ देणार नाही

Manoj Jaranges warning; Announcement of a big protest : मनोज जरांगे यांचा इशारा; मोठ्या आंदोलनाची घोषणा

Antarwalisarati : मराठा आरक्षणासाठी दीर्घ लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही मदत मिळाली नसल्याने जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, “शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आम्ही आगामी निवडणुका होऊ देणार नाही.”

जरांगे म्हणाले, “देशाला थरकाप उडेल असं मोठं आंदोलन आम्ही उभारू. राज्यभरातील शेतकरी संघटना आणि नेत्यांना अंतरवाली सराटीत बोलावून आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येईल.” त्यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत गावात निवडणूक साहित्य किंवा बॅलेट पेपर येऊ देऊ नका.”

Use of AI : एआयच्या वापराविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

दरम्यान, जरांगे यांनी सरकारकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांना दिलेल्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील मदतीवरही टीका केली. ते म्हणाले, “ही मदत तात्पुरती आहे. निवडणुकीत लाडक्या बहिणींना फसवणाऱ्यांचा देव्हारा करावा. त्यांनी पुन्हा कोणालाही फसवू देऊ नका.”

या भाषणादरम्यान मंत्री धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावरही जरांगे यांनी जोरदार प्रहार केला. त्यांनी म्हटलं, “धनंजय मुंडे तर गिनतीत नाहीत. त्यांची बायको आली, पण आम्ही बाईच्या आडून वार करत नाही. खून करणारे आणि जातींमध्ये भांडणं लावणारे आता वारसा चालवत आहेत हीच भुजबळांची भूमिका आहे.”

Local Body Election : ..तर आमचे लोक शरद पवारांच्या पक्षात जाऊन निवडणूक लढतील !

जरांगे पुढे म्हणाले, “मंत्रीमंडळाने काढलेला जीआर रद्द करता येत नाही. आम्हाला दिलं म्हणून फडणवीसांनी मराठ्यांची मनं जिंकली. प्रमाणपत्र वाटपाची जबाबदारी ही फडणवीसांची आहे.”

शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रलंबित मदत, आणि मराठा आरक्षण या तिहेरी मुद्यांवरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट भिडण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आगामी काही दिवसांत अंतरवाली सराटी पुन्हा एकदा आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

____