One crore each from Shirdi, Tuljapur temple institutions : शिर्डी, तुळजापूर मंदिर संस्थांकडून एक एक कोटी
Mumbai : राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पंचनामे तातडीने करून मदत देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या संकटाच्या काळात सामाजिक आणि धार्मिक संस्थाही बळीराजाच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत ही मदत घोषित केली असून या निधीचा उपयोग अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीची मदत पुरवण्यासाठी होणार आहे.
Vanchit Bahujan Aghadi : पाणी हा मूलभूत अधिकार, महापालिका नळ तोडू शकत नाही!
याचबरोबर तुळजापूर येथील भवानी मंदिरानेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मंदिर प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, मुंबईतील लालबागचा राजा गणेश मंडळानेही सामाजिक बांधिलकी दाखवत 50 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहीर केली आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले; आम्ही दंगेखोर कसे?
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले आहेत. शेतीचे नुकसान, घरांचे पडझड, जनावरांसाठी चारा टंचाई अशी बिकट परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि सामाजिक संस्थांकडून मिळणारा हातभार हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
____