Breaking

Hindi language controversy : हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला; तरीही ठाकरे बंधू एकत्र येणारच!

Uddhav and Raj Thackeray will hold victory meeting : जनतेचे अभिनंदन करत उद्धव आणि राज ठाकरे विजय सभा घेणार

Mumbai: पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन राज्यात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. होता. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे बंधूंनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी राज आणि उद्धव ठाकरे विजय सभेच्या माध्यमातून एकत्र येताना पाहायला मिळणार आहे दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला तेव्हा यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, विषय रद्द झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे अभिनंदन. साहित्यिक, मोजके कलावंत, मराठी पत्रकार, सर्व संबंधितांचेही आभार. हा विषय क्रेडिटचा नाही. पण विषय निघाला तेव्हा सगळ्यात आधी आम्ही विरोध केला. उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आणि इतरही काही पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळे न भूतो न भविष्य असा हा मोर्चा निघाला असता. खरंतर या गोष्टी करायची काही आवश्यकताच नव्हती. मंत्री दादा भुसे आले तेव्हा मी म्हटलो की, या विषयात काही तडजोड होणारच नाही.

Amravati University : पश्चिम विदर्भाच्या प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास होणार

हिंदी काही राष्ट्रभाषा नाही, जी तुम्ही लादावी, ती एका प्रांताची भाषा आहे. हे मान्य होऊच शकत नाही. तसेच हिंदीसक्तीबाबतचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर काल मला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मला फोन आला होता. राऊत म्हणाले, पुढे काय करायचं, विजयी मेळावा करुया. मी म्हणालो, 5 जुलैला विजयी मेळावा घेऊया, घेऊया, चर्चा करुन या संदर्भात बोलू, आम्ही अद्याप ठिकाण वैगरे निश्चित केलेलं नाही.माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून मी सांगेन, असं राज ठाकरे म्हणाले. 5 तारखेला विजयी मेळावा होईल, त्या मेळाव्यात ही कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल,

दरम्यान माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी, ज्या ज्या मराठी भाषिकांनी पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे. सरकारला शहाणपण सुचले की नाही येत्या काही दिवसात कळेल. मराठी माणसाची एकजूट झालेली आहे, त्यांनी निर्णय रद्द केला नसता तर त्यांना मराठीची अबूतपूर्व ताकद दिसली असती. अगदी भाजपा मधले तसेच अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी मोर्चात होणार होते. मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असले पाहिजे. आता नवीन एक समिती नेमली त्या समितीमध्ये भाषेवरील अभ्यासासाठी अर्थतज्ञ नरेंद्र जाधव नेमला आहे अशी टीकाही त्यांनी केली.

Sharad Pawar NCP : शरद पवार गट सरकारला विचारणार जाब!

मी त्यांना म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे. शिक्षण विषयांमध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे. विजय मोर्चा काय आणि कुठे हे जाहीर होईल. या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे आहे की, आपण एकत्र आल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा डोकं वर काढणार नाहीत. असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे. सगळे पक्ष भेद विसरून आमच्यासह एकत्र पाऊल उचलले होते. आपल्याला एकजूट दाखवण्याची आवश्यकता आहे. असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.