Breaking

Hindi Marathi Conspiracy : उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला ?

BJP leader Chandrashekhar Bawankule says why Shiv Sena chief Uddhav Thackeray accepted the Hindi compulsion report : मराठी भाषा केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नव्हे

Nagpur : महाराष्ट्रात पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा इतका पेटला की, महाराष्ट्रात चर्चेसाठी किंवा राजकारणासाठी दुसरे काही विषयच नाहीत का, असे वाटू लागले. याच मुद्यावरून दोन ठाकरे बंधुंची बहुप्रतिक्षीत एकी झाल्याचे आज (५ जुलै) बघायला मिळाले. आता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरून भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हिंदी भाषा सक्तीचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच स्वीकारला होता, असा हल्लाबोल भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना सन २०२२ मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी अद्याप दिलं नाही. मराठी भाषा ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाही, तर ती धोरणात दिसली पाहिजे.

Ravikant Tupkar : बैल नाही म्हणून औत ओढणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला ‘क्रांतिकारी’चा आधार!

उद्धव ठाकरे मुंबईत सत्तेत असताना त्यांनी मराठी माणसाला तेथून हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर आपलं बेगडी प्रेम दाखवत आहेत. उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे. यांचे मराठी प्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे.’

Sudhir Mungantiwar : मराठीच्या मुद्यावर दूर दूरपर्यंत कुठलेही राजकारण नाही !

राज आणि उद्धव ठाकरे आज एका मंचावर एकत्र आल्याने मनसैनिक (पूर्वाश्रमीचे शिवसैनिक) आणि शिवसैनिकांमध्ये १०० हत्तींचे बळ संचारले आहे. याचा पहिला नमुना ‘सुशील केडिया’च्या रुपाने महाराष्ट्राने पाहिला. आता भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या की, त्याला शिवसेना आणि मनसेकडून उत्तरे येणारच. यासाठी संजय राऊत आणि संदीप देशपांडे सज्ज आहेत. त्यामुळे पुढे हा सामना पाहणे चांगलंच मनोरंजक ठरणार, असं दिसतंय.