Breaking

Hindi Marathi Conspiracy : भांडण केले सत्तेसाठी अन् एकत्र येत आहेत, तेही सत्तेसाठीच !

BJP leader Chandrashekhar Bawankule’s counterattack on Shiv Sena chief Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray : हिंदीची सक्ती त्यांनीच केली अन् आता आमच्या नावाने टाहो फोडत आहेत

Nagpur : हिंदी भाषा सक्तीवरून मोठा गदारोळ माजवण्यात आला. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच सांगितलं होतं की, हिंदी पर्यायी विषय आहे. खरं म्हणजे २०२२ मध्ये हिंदी सक्तीचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्वीकारला होता. पण आता आमच्या नावाने टाहो फोडत आहेत. गमावलेले जनमत मिळवण्यासाठी ही नौटंकी आहे. केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. पण आता ते शक्य नाही. कारण दोन ठाकरे बंधुंचे भांडण सत्तेसाठीच झाले होते, अन् आता ते एकत्र येत आहेत, तेही सत्तेसाठीच, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नागपुरात पत्रकाराशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, उद्धव आणि राज ठाकरे या दोन भावांनी एकत्र यावे, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याबद्दल आमचा काय कुणाचाही आक्षेप असण्याचे कुठलेही कारण नाही. एकत्र येण्यासाठी दोन्ही भावांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही अजेंडा नाही, तर त्यांनी केवळ भाषणबाजी केली. मराठी माणूस त्यांना समर्थन देईल की नाही, याबाबत शंकाच आहे. केवळ सहानुभूती मिळवण्याचा हा कार्यक्रम होता. मंचावर सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) वावर दिसला. पण काँग्रेसचे अस्तित्व नव्हते.

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्री बावनकुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले!

उद्धव ठाकरे जातीयवादी राजकारणात पडतील, असं कधी वाटलं नव्हतं. राज आणि उद्धव ठाकरे या भावांना एकत्र येण्यासाठी आम्ही आधीच शुभेच्छा दिल्या आहेत. दोन भावंड एकत्र आले, हे चांगलेच आहे. कुठल्या ना कुठल्या सण समारंभांसाठी ते एकत्र येतातच. पण यावेळी ते राजकीय मंचावर एकत्र आले. हा पूर्णपणे त्यांचा राजकीय सोहळा होता. त्यासाठीच ते एकत्र आले, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.