Devendra Fadnavis’s attack on Aditya Thackeray was followed by criticism from Sanjay Raut, Jitendra Awhad, Nana Patole, Vijay Wadettiwar, Rohit Pawar, Sandeep Deshpande : ..मग एक जीआर काढून सर्वच्या सर्व इंग्रजी शाळा बंद करून टाका
Mumbai : भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे. इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून ती शिकली पाहिजे. त्याचा विरोध नाही. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या. ‘बॉम्बे स्कॉटीश’मध्ये शिकायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा. हा विरोध आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला. आदित्य ठाकरे ‘बॉम्बे स्कॉटीश’मध्ये शिकले आहेत. म्हणून फडणवीसांनी हा टोला लगावला.
देवेंद्र फडणीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावल्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, असं असेल तर फडणवीसांनी पंतप्रधानांना सांगावं की परदेशातून ज्या इंग्रजी, इंटरनॅशनल शाळा येथे आणल्या जात आहेत, त्या बंद करा. नाही तरी आरएसएसची मागणी आहेच. तेव्हा एक जीआर काढून या शाळा बंद करून टाका. तसाही फडणवीसांना जीआर काढण्याचा शौक आहेच.
Devendra Fadnavis-Sanjay Raut clash : मुंबईवरून फडणवीस-राऊतांमध्ये जुंपली, काढला एकमेकांचा बाप !
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, आपल्या येथे सीबीएसई, आयसीएसईमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली जाते. तर मग मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय? तामीळनाडूमध्ये स्टॅलीन यांनी सीबीएसई आणि आयसीएसईमध्ये तिसरी भाषा रद्द करवून घेतली. मग आमच्या मुख्यमंत्र्यांना का असं वाटत नाही की आपणही तसंच करावं? तर इंग्रजी शाळेत आम्ही पण शिकलो. पण मराठी भाषेवर आमचं प्रभुत्व आहेच. भाषेवर कुणाचं किती प्रभुत्व हे शाळेत आणि शिक्षणातून येत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात इंग्रजी अनिवार्य करून टाकली पाहिजे. त्यांनी काढलेला जीआर त्यांनीच का रद्द केला, याचं उत्तर फडणवीस का देत नाहीत? आपली चूक झाकण्यासाठी दुसऱ्यांची टिंगल करणं फडणवीसांनी बंद करावं, असे नाना पटोले म्हणाले. तर विजय वडेट्टीवार यांनीही फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला. गुजरातची मंडळी सीबीएसई शाळांत जातात म्हणून त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान नाहीये का? मग तिथे हिंदीची सक्ती का करत नाही? मातृभाषेला विसरा, असं म्हणणं योग्य नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
crime news : शिक्षिकेचा प्रताप! अल्पवयीन विद्यार्थ्याला फाइव स्टार हॉटेलमध्ये नेऊन करायची अत्याचार
दिल्लीश्वरांकडून आलेला आदेश जसाच्या तसा राबवता आला नाही. स्वतःच काढलेला जीआर रद्द करावा लागला. त्यामुळे काही नेत्यांचा इगो हर्ट झालेला आहे. त्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, असं धोरण सरकारने अवलंबलेलं दिसतंय, अशी टिका आमदार रोहित पवार यांनी केली.