Raj Thackeray to visit Mira Bhayandar on July 18 : मराठी माणसाला काय संबोधित करणार, याकडे लक्ष
Mumbai : हिंदी – मराठी भाषेच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मिरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी तेथे एक मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने मोर्चाची हाक दिली होती. त्या मोर्चाच्या आधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या एकंदर पृष्ठभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १८ तारखेला मिरा भाईंदरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
१८ जुलैला सायंकाळी ७ वाजता राज ठाकरे मिरा भाईंदरला पोहोचतील. यावेळी मराठी जनतेला ते काय संबोधित करणार, याकडे तमाम मराठी मामसाचे लक्ष लागलेले आहे. मराठी – अमराठी वादाची खरी सुरुवात मिरा रोडमधूनच झाली होती. मनसेच्या सैनिकाने व्यापाऱ्याला मारल्यानंतर या वादाला तोंड फुटले होते. यानंतर मनसेच्या त्या कार्यकर्त्याला अटकही झाली होती. त्यानंतर मिरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढला होता. या संपूर्ण वादानंतर राज ठाकरे मिरा भाईंदरला जाणार आहेत. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
Shiv Sena-BJP : खुल्या भूखंडावरील अनधिकृत मंगल कार्यालय कुणाचे?
मराठी एकीकरण समिती आणि मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची त्यावेळी धरपकड करण्यात आली होती. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यातही घेतलं होतं. तरीही कडवट मनसैनिकांनी मोर्चा काढला होता. या वादानंतर तेथील पोलिस आयुक्तांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. या घटनाक्रमानंतर मनसैनिकांचा उत्साह चांगलाच बळावला आहे. राज ठाकरे मिरा भाईंदरला मनसैनिक आणि मराठी माणसांना भेटणार आहेत. यावेळी ते काय भूमिका मांडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.