Breaking

Hindi Marathi Conspiracy : मनसेकडूनही जय्यत तयारी, लोकलमधून सुरू केला प्रचार !

Uddhav Thackeray’s Shiv Sena and Raj Thackeray’s MNS are making strong preparations : ठाकरे बंधुंचा एकत्रित मोर्चा, शरद पवारांचाही पाठींबा

Mumbai : इयत्ता पहिली ते पाचव्या वर्गापर्यंत हिंदी भाषा सक्तीची केल्याच्या विरोधात ५ जुलैला मराठी माणसाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा राहणार नसला तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या मोर्चाची तयारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि आमदार वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यावर मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काॅग्रेसने (शरदचंद्र पवार) या मोर्चाला पाठिंबा दिला असला तरी त्यांच्या पक्षातून जबाबदारी कुणावर सोपवण्यात आली आहे, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. आज किंवा उद्या राष्ट्रवादीकडून मोर्चात कोण सहभागी होणार आहे, हे स्पष्ट केले जाईल, असे आज (२८ जून) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज लोकलमधून या मोर्चाचा प्रचार आणि प्रसार केला.

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंची शिवसेना दाखवणार एकीचे बळ !

या मोर्चात राजकीय मुद्दे बाजुला सारून मराठी माणसाने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिंदीच्या मुद्यावरून निघणाऱ्या या मोर्चामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वॉर भडकल्याचे चित्र आहे. हा मोर्चा निघतो आहे, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत. ज्या पद्धतीने हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे, त्याबद्दल लोकांच्या मनात राग आहे. हा राग ५ जुलैला मोर्चात सामील होऊन लोकांनी व्यक्त केला पाहिजे, ही आमची भावना आहे. त्यासाठी आम्ही ही जनजागृती सुरू केली आहे, असे संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांना सांगितले.