The organizer expressed the need for Hindus to organize : हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या राष्ट्रीय संघटकांचे विधान
Akola देशात सध्या एक ‘अभद्र युती’ सक्रिय असून, ही युती हिंदुस्थानला बदनाम करण्याचे काम करत आहे. अर्बन नक्षलवाद्यांसह स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे, तसेच इतर पंथीयांतील हिंदुधर्मद्वेष्टे हे या युतीचे भाग आहेत. देशात हिंदूविरोधी शक्तींच्या या अभद्र युतीचा बीमोड करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले.
हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते.
या वेळी “राष्ट्र-धर्माची सध्यस्थिती व हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित कार्याची आवश्यकता” या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
घनवट म्हणाले, हिंदू धर्माची प्रतिमा मलिन करणे, शिक्षण संस्थांमधून हिंदूविरोधी विचारांची पेरणी करून युवकांची दिशाभूल करणे, लव्ह जिहाद, धर्मांतराला प्रोत्साहन देणे अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू आहेत. यासाठी एक ‘इको सिस्टिम’ सक्रिय असून, हे व्यापक षड्यंत्र ओळखून आपणही संघटितपणे आपली इको सिस्टिम उभारण्याची गरज आहे. अन्यथा हिंदू समाजाचे भविष्य धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Chandrashekhar Bawankule : आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणाऱ्यांना चपराक !
हिंदुत्वनिष्ठांवरील अन्यायावर सडकून टीका
साध्वी प्रज्ञा सिंग, शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांसारख्या संत व हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेवर त्यांनी सडकून टीका केली.
सभेला २०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती
या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धर्मप्रेमी नागरिक व अधिवक्ते असे २०० पेक्षा अधिक जण उपस्थित होते, अशी माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीच्या अश्विनी सरोदे यांनी केले.
जिल्ह्यातील कार्याचा आढावा सादर
कार्यक्रमात हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक उदय महा यांनी समितीच्या जिल्हास्तरीय कार्याचा आढावा सादर केला. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले.
विशेषतः पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांप्रकरणी दीडशेहून अधिक धर्माभिमानी नागरिकांनी एकत्र येत प्रभावी आंदोलन केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
हिंदू समाजात एकजूट आवश्यक – पिसोळकर
“इतर धर्मीय समाज आपल्यासाठी संघटितपणे उभा राहतो, मात्र हिंदू मात्र आपसातच विभागलेले दिसतात,” असे निरीक्षण हिंदू जनजागृती समितीचे श्रीकांत पिसोळकर यांनी नोंदवले. सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन हिंदूविरोधी कारवायांना विरोध करणे आवश्यक असून, यातच सर्वांचे हित आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवरून सरकारने घेतला ठोस निर्णय !
हिंदूविरोधी वक्तव्यांचा समाचार
काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्यांचा सुनील घनवट यांनी तीव्र समाचार घेतला. अशा वक्त्यांविरोधात उभे राहण्याचे आवाहन करत, “धर्म, देश व संस्कृतीच्या रक्षणासाठी ही वेळ निर्णायक आहे,” असेही ते म्हणाले.