Breaking

Hinjewadi IT Park : आयटीवाल्यांचं ऐकतात, आम्हाला गृहीत धरता !

Sarpanch makes direct allegations against DCM Ajit Pawar: सरपंचांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप

Pune : ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट आरोप करत म्हटलं आहे की, अजितदादा आयटीवाल्यांचं शांतपणे ऐकतात, पण आम्हाला विश्वासात घेत नाहीत. आमची बाजू ऐकून घेतली जात नाही. गेल्या आठवड्यात अजित पवारांनी दौऱ्यावेळी सरपंच जांभुळकर यांना जाहीरपणे खडेबोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र आता सरपंचांनी त्या घटनेबाबत स्पष्टीकरण देत अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.

Sudhir Mungantiwar : लोकांचे प्रेम हेच खरे सेवाकार्याचे टॉनिक !

“दादा रागावले नाहीत, पण गैरसमज झाला. मी रस्त्यांच्या रुंदीकरणावर चर्चा करायला गेलो होतो. त्या भागात मंदिरं, शाळा, घरं आहेत. रस्ता थोडा कमी करून घ्यावा, एवढीच विनंती होती,” असं जांभुळकर यांनी स्पष्ट केलं. तसेच त्यांनी सांगितले की, गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या. बैठकीला आम्हाला बोलावलं जात नाही. अजितदादांनी स्वतः लक्ष घालावं. रस्त्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. अन्यथा आम्हाला न्यायालयात जावं लागेल. ग्रामसभेत आज ग्रामस्थ आक्रमक झाले असून, सोमवारी या मुद्द्यावर बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.