Sachins call Sports Minister Kokates response : सचिनची साद, क्रीडामंत्री कोकाटेंचा प्रतिसाद
Mumbai : राज्यातील महिला खेळाडूंसाठी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकरण सोहळ्यात महिलांना क्रीडांगणावर सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण मिळावे, तसेच देशभरात महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध व्हावी, असे भावनिक आवाहन केले होते. या आवाहनाला राज्य सरकारने प्रतिसाद देत तात्काळ कारवाई केली असून, सर्व क्रीडा संकुल, जिमखाना, स्टेडियम आणि स्थानिक मैदानांवर स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज चेंजिंग रूम उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली की, महिला खेळाडूंसाठी राज्यभर या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्तरावर या सुविधा प्राधान्याने उभारल्या जाणार असून, जुनी इमारती दुरुस्त करणे अथवा नवीन चेंजिंग रूम बांधण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Decision for help : नव्या निर्णयामुळे ३४ जिल्ह्यांतील ३४७ तालुक्यांना मदत!
या चेंजिंग रूममध्ये स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आणि सीसीटीव्ही देखरेख असणार आहे. तसेच महिला सुरक्षा कर्मचारी प्रत्येक ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे महिलांना क्रीडा क्षेत्रात अधिक आत्मविश्वास आणि सन्मानपूर्वक सहभाग घेता येईल, असे कोकाटे यांनी सांगितले.
OBCs Rise in Protest : ओबीसींची माथी भडकवू नका, बावनकुळेंचा वडेट्टीवारांना इशारा !
सचिन तेंडुलकर यांच्या सूचनेला दिलेला हा तातडीचा प्रतिसाद देशभरात कौतुकास्पद ठरला आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय ‘बेटी बचाओ, बेटी को खिलाओ’ या केंद्र सरकारच्या मोहिमेला नवसंजीवनी देणारा ठरेल. आता राज्यातील प्रत्येक मुलगी भीतीने नव्हे, तर अभिमानाने मैदानात उतरेल, असं प्रतिपादन क्रीडामंत्री कोकाटे यांनी केलं. या निर्णयामुळे राज्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.








