Transfers of 17 officers in Buldhana Police Force : चौघांना प्रशासकीय कारणांनी हलवले, काहींचे तात्पूरते स्थानांतर
Buldhana बुलढाणा पोलीस दलातील १७ अधिकाऱ्यांची बदली करून नवीन पदस्थापना करण्यात आली आहे, तर एका अधिकाऱ्यास वर्षभरासाठी त्याच ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने हा निर्णय झाला.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ आणि महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अध्यादेश २०१४ मधील कलम २(१) व २(२) नुसार, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने प्रशासकीय कारणास्तव चार पोलीस निरीक्षक, अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या. तर एका पोलीस उपनिरीक्षकांना वर्षभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे.
Uddhav Balasaheb Thackarey : माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवा, शिवसेनेची मागणी
यामध्ये शिवाजीनगर (खामगाव) चे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांची शेगाव ग्रामीण येथे बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे संत गजानन महाराज मंदिर सुरक्षेचा अतिरिक्त पद्भारही देण्यात आला आहे. बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षातील पोनि सुरेंद्र अहेरकर यांना शिवाजीनगर ठाणेदार, संत गजानन महाराज मंदिर सुरक्षेचे पोनी हेमंत ठाकरे यांना जिल्हा वाहतूक शाखा (बुलढाणा) तर सुरक्षा शाखा, (बुलढाणा) चे पोनि अशोक काकविपुरे यांना जिल्हा विशेष शाखा (बुलढाणा), धाड ठाणेदार आशिष चेचरे यांना शिवाजीनगर (खामगाव), बुलढाणा शहरचे सपोनि प्रताप भोस यांना धाड ठाणेदार, किनगाव राजा ठाणेदार विनोद नरवाडे यांना नियंत्रण कक्ष (बुलढाणा) येथे पाठविण्यात आले आहे.
चिखलीचे सपोनि संजय मातोंडकर यांना ठाणेदार किनगाव राजा ठाणेदार, रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपुत यांना दहशतवाद विरोधी कक्ष (बुलढाणा), दहशतवाद विरोधी कक्षाचे सपोनि निलेश साळोंखे यांना ठाणेदार रायपूर, जिल्हा वाहतूक शाखेचे स्वप्निल नाईक यांना पोलीस स्टेशन (नांदुरा), मलकापूर शहरचे सपोनि मल्हारी शिवणकर यांना सुरक्षा शाखा (बुलढाणा) येथे पाठविण्यात आले.
NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी लागली कामाला, स्थानिक निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर
नियंत्रण कक्ष (बुलढाणा) चे सपोनि अशोक अवचार यांना पोलीस स्टेशन (मेहकर), नियंत्रण कक्ष (बुलढाणा) चे सपोनि धैर्यशील घाडगे यांना जिल्हा वाहतूक शाखा (बुलढाणा), नियंत्रण कक्ष (बुलढाणा) चे सपोनि दिलीप राठोड यांना पोलीस स्टेशन (मलकापूर शहर), उपविभागीय पोलीस अधिकारी (मेहकर) येथील वाचक शाखेचे पोउपनि राजाभाऊ घोगरे यांची पोलीस स्टेशन (लोणार) मेहकरचे पोउपनि गणेश कड यांना उपविभागीय पोलीस अधिकारी (मेहकर) वाचक शाखा, तर जळगाव जामोदचे पोउपनि नारायण सरकटे यांना वर्षभरासाठी स्थगिती देण्यात आली.