Breaking

Honey Trap Case : हनी ट्रॅप प्रकरणात जामनेर, पहूर येथे धाडी, प्रफुल लोढा अटकेत !

Confidant of a big leader, Khadse makes serious allegations by : तो तर एका मोठ्या नेत्याचा विश्वासू, खडसेंचे गंभीर आरोप

Jalgaon : राज्यात नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना, पहूर आणि जामनेर येथे धाडी पडल्या असून प्रफुल लोढा यांना अटक झाली आहे. लोढा हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत,मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत निवडणूक लढवण्याचाही प्रयत्न केला होता. अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवूत त्यांच्यासोबत अनैतिक कृत्य करून, त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे आरोप लोढावर आहेत. त्यांच्या विरोधात मुंबईत गुन्हे दाखल असून त्या संदर्भातच ही धाड पडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी गंभीर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातल्या या स्कँडल प्रकरणी म्हणले आहे की, ज्यांच्यावर आरोप आहेत ते प्रफुल्ल लोढा भाजपचेच कार्यकर्ते आहेत. लोढांवर मुलींचे अश्लिल व्हिडीओ काढून त्यांना धमकावले जात असल्याचे आरोप आहेत. हेच लोढा भाजपच्या एका मोठ्या नेत्याचे विश्वासू कार्यकर्ते असल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. त्यामुळे खडसेंच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी भाजपचा एक बडा नेता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Maharashtra : अस्वस्थ वर्तमान! महाराष्ट्रात नेमकं चाललय काय?

62 वर्षीय प्रफुल लोढावर नोकरीचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय मुलींसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लिल छायाचित्र काढून, मुलींना लोढा हाऊसमध्ये डांबून त्यांना धमकावल्याचाही आरोप आहे. अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये लोढावर पोस्को, बलात्कार, खंडणीसह हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जुलै रोजी प्रफुल्ल लोढाना पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेमुळे अनेक राज समोर येतील असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Imtiaz Jaleel : लोकप्रतिनिधींची गुंडगिरी जनता सहन करणार नाही

मुंबई पोलिसांकडून जळगावच्या , जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा याच्या मालमत्तेची तपासणी केली. लोढा यांचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. 2024 मध्ये लोढाला ‘वंचित’कडून उमेदवारी मिळाली होती. मात्र 5 दिवसातच लोढा याने उमेदवारीतून माघार घेतली. लोढांवर लासलगावमध्ये माजी नगरसेवकाच्या फसवणुकीचा गुन्हा ही दाखल आहे.

Mahayuti Government : मोरखेडमधील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा!

प्रफुल लोढाच्या अटकेनंतर याप्रकरणी आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रफुल लोढानी बनवलेले अश्लिल व्हिडीओ, भाजप वरिष्ठापर्यंत पोहचवून तक्रार केली असे खडसेंनी स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्यात सुरु असलेलं ‘ सेक्स सँक्डल’ कुणाच्या आशीर्वादानं सुरु होतं? खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजप वरिष्ठांनी का कारवाई केली नाही?आणि प्रफुल लोढा कुणाच्या जीवावर अशी गुंडगिरी करत होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

__