Is there any connection between them Girish Mahajas question to Sanjay Raut : यांचा पण संबंध आहे का? गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांना सवाल
Mumbai : राज्यात सध्या हनी ट्रॅप प्रकरण चांगलेच गाजत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर या संबंधाने प्रश्न उपस्थित केल्यामुळे खळबळ माजली. यावर आज गिरीश महाजन यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. प्रफुल्ल लोढा हा सर्वपक्षीय माणूस आहे. त्याचे शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासोबत फोटो आहेत. ते मोबाईलवर दाखवत महाजनांनी त्या ट्रॅपचा यांचा पण संबंध आहे का? या सर्वांची पण आता सीबीआय आणि एसआयटी चौकशी करायची का? असा सवाल केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपचा विषय चांगलाच चर्चेत आहे. प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाज माध्यमावर मंत्री गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचा एक फोटो ट्विट केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे सांगितले, या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या, दूध का दूध पानी का पानी होईल, काही मंत्री, अनेक अधिकारी यात अडकले आहेत. शिवसेनेतून फुटलेले खासदार याच ट्रॅपमुळे पळाले, असा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय. आता यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला.
Manikrao kokate controversy : शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील असलेल्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या
गिरीश महाजन म्हणाले की, प्रफुल्ल लोढा हा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. तो अनेक पक्षात होता. शरद पवार, जयंत पाटील, अजित दादा पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबत प्रफुल्ल लोढा यांचे फोटो आहेत, असे म्हणत त्यांनी मोबाईलवर प्रफुल्ल लोढा याच्यासोबत नेत्यांचे फोटो दाखविले. तर प्रफुल्ल लोढा याच्या सोबत फोटो असलेल्या उद्धव ठाकरे, शरद पवार, अजितदादा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचा पण हनी ट्रॅपशी संबंध आहे का? या सर्वांची पण आता सीबीआय आणि एसआयटी चौकशी करायची का? असा सवाल देखील मंत्री महाजन यांनी उपस्थित केला.
Manikrao Kokate ; सुरज चव्हाणची उचल बांगडी, माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढानं गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकणार नाहीत, यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी केली. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, काही वर्षापूर्वी लोढा याने खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली होती. खडसे यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला, त्यावेळी मी खडसे यांच्या सोबत होतो, मग त्या प्रकरणाची चौकशी करायची का? अशा शब्दात त्यांनी खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
Chandrashekhar Bawankule : खुफिया यंत्रणा आहे तरी कुठे? पोलिसांचा धाक संपलाय का?
मी एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही, पण खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कोणत्याही प्रकरणात त्यांना मीच दिसतो. काही वर्षापूर्वी व्हिडिओ बघितले होते प्रफुल्ल लोढा अत्यंत खालच्या भाषेत एकनाथ खडसे यांना बोलताना दिसत आहे. त्याला काय म्हणावे? कोणत्याही प्रकरणात खडसे माझा संबंध जोडून माझी बदनामी करतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, पण मी खालच्या पातळीवर जाणार नाही. प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केली आहे, त्याची चौकशी पोलीस करतील. जे सत्य आहे ते समोर येईलच, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
_______