Breaking

Honor of the District Collector : सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा पुन्हा अव्वल !

 

Sudhir Mungantiwar’s Chandrapur district tops again : १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी

Chandrapur : सूर्याने आग ओकणाऱ्या दाहकतेने भयभीत करणाऱ्या या जिल्ह्याचे नाव शीतलता देणाऱ्या चंद्राच्या नावावरून ‘चंद्रपूर’ असे आहे.या जिल्ह्याने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. या जिल्ह्याचे भूमिपूत्र, नेते राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले आहेत. आता हा जिल्हा पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.

राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रभावीपणे केली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगीरीबद्दल त्यांना मुंबई येथे आयोजित ‘जिल्हा निर्देशांक २०२३’ समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Pombhurna Agriculture Office : ‘दिला शब्द केला पूर्ण’, मुनगंटीवारांच्या हस्ते पोंभूर्णा कृषी कार्यालयाचे उद्घाटन !

चंद्रपूर जिल्ह्याला आणखी एक नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांचा सत्कार केला. चंद्रपूरने दोन वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे. सोबतच सैनिकी स्कूल, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी पाठवलेले लाकूड, वन अकादमी आदी कामांमुळे चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात नेहमी समोरच राहिलेला आहे.

Caste-wise censuses : सामाजिक न्यायाची दारे उघडतील !

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या गेल्या ३५ वर्षांच्या समाजकारण आणि राजकारणात चंद्रपूर जिल्ह्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. जिल्हा अव्वल रहावा, यासाठी नेहमी प्रयत्न केले आणि आजही करत आहेत. चंद्रपूर जिल्हा नेहमी नंबर वन रहावा, हा त्यांचा संकल्प आहे आणि यापुढेही चंद्रपूरची यशोगाथा सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्याचा प्रयत्न राहिल, असे आमदार सुधीर मुनगंटीवार याप्रसंगी म्हणाले.