Mention of caste on examination hall ticket : दहावी-बारावी परीक्षा; प्रकरणामुळे वाद पेटला
Akola : दहावी-बारावी परीक्षांच्या हॉल तिकीटांवर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महायुती सरकारला या मुद्यावरून विरोधक धारेवर धरू शकतात. बोर्डाच्या चुकीमुळे असे झाले आहे की यात राजकीय हस्तक्षेप आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पातोडे यांनी म्हटले आहे की, हॉल तिकीटावरील जात प्रवर्गाचा उल्लेख हा आधुनिक मनुवादाचा भाग आहे. ‘अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यासाठी हा कुटील डाव रचला गेला आहे. विद्यार्थ्यांना या प्रकारातून होणाऱ्या मानसिक त्रासाची जबाबदारी मंडळाने घ्यावी,’ असे ते म्हणाले.
PM Narendra Modi : मराठीतून संवाद, वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् विचारपूस!
मात्र, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात की, शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरवरील चुकीची जात नोंद दुरुस्त करण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जांसाठी प्रवर्ग तपशील आवश्यक असतो. त्यामुळे पालकांनी गैरसमज पसरवू नये.
याउलट, वंचित बहुजन युवा आघाडीने या स्पष्टीकरणावर आक्षेप घेतला आहे. मंडळ दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे. हॉल तिकीटावरील जातीचा उल्लेख विद्यार्थ्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम करतो, असे आघाडीचे म्हणणे आहे. या प्रकरणावर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे.
Anil Deshmukh : पालकमंत्री ठरवायला आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करणार का?
प्रमुख मुद्दे
काय घडले? : विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्गाचा उल्लेख.
मागणी : उल्लेख रद्द करून संबंधितांवर कारवाई करावी.
मंडळाची भूमिका : शिष्यवृत्ती अर्जांसाठी हा उपाय उपयुक्त.
वंचितची भूमिका : वादाला तोंड द्यावे लागू नये म्हणून मंडळाने भूमिका स्पष्ट केली.