Breaking

Humani worm : हुमणी अळीचा प्रकोप; उद्धव सेनेच्या नेत्या पोहोचल्या शिवारात

Uddhav Sena leaders reach farmers : सरकारवर व्यक्त केला संताप; तातडीच्या मदतीची मागणी

Buldhana बुलडाणा, मोताळा आणि चिखली तालुक्यात हुमणी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारात जाऊन पीक पाहणी केली. सरकारकडून पंचनाम्यांचे केवळ औपचारिक प्रयोग न करता तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोयाबीन पिकावर झालेल्या अळीच्या प्रादुर्भावामुळे काही भागांत ८० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यावरून राज्यातील महायुती सरकारचा अकार्यक्षम कारभार पुन्हा एकदा उघड झाल्याचे ॲड. शेळके यांनी सूचित केले.

Rohit Pawar : रोहित पवार म्हणतात, सरकार संवेदनाशून्य, पालकमंत्रीही फिरकले नाहीत

“फक्त पंचनाम्यांवर वेळ दवडू नका. शेतकरी दुसऱ्यांदा पेरणी करत आहेत, त्यांच्या हाती मोफत किंवा सवलतीच्या दरात बियाणे द्या आणि झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करा,” अशी ठाम मागणी शेळके यांनी केली. त्या म्हणाल्या, “राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता तरी सरकारने डोळे उघडावेत.”

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ३१४.७४ हेक्टर क्षेत्र अळीने बाधित झाले असले तरी प्रत्यक्षात नुकसान यापेक्षा कितीतरी अधिक आहे, असा आरोपही स्थानिक शेतकऱ्यांसह शेळके यांनी केला. या संपूर्ण परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

Malegaon encroachment case : ‘घर नाही, जमीन नाही – आम्ही कुठं जावं?’ – चिठ्ठीत वनाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पीक पाहणी दरम्यान मोताळा तालुक्याचे कृषी सहायक माधुरी बुंदे, तलाठी अजित पालवे, तसेच शेतकरी प्रतिनिधी गोपीचंद राठोड, भास्कर पवार, प्रमिलाबाई राठोड, आकाश राठोड यांच्यासह मोहेगाव शिवारातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.