I want the power to create happiness on their faces : आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जंगो आईला साकडे
Jivati Chandrapur : जिवती तालुक्याने जेव्हा जेव्हा विकासकामांसाठी हाक दिली, तेव्हा तेव्हा मी खंबीरपणे पाठिशी उभा राहिलो आहे. आताही अनेक मागण्या आल्या आहेत. त्यांचा सकारात्मक विचार करून तालुक्याच्या विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी सदैव तत्पर आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला.
जिवती येथील माता जंगोदेवी देवस्थानात पौष महिन्यातील यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार मुनगंटीवार आले होते. माता जंगोदेवीचे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, आदिवासी चळवळीचे नेते जगन येलके, गणेश परचाके, विवेक बोढे, नामदेव डाहुले, हरीश ढवस, अजित मंगळगिरीवार, राहूल संतोषवार, विनोद देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Child labor law : बालकामगार कायदा केवळ कागदावरच; उपाययोजना अपयशी !
आमदार मुनगंटीवार म्हणाले, ‘या स्थानावर येणारी व्यक्ती ऊर्जा आणि शक्ती घेऊन जात असते. माझी जंगो आईला एवढीच प्रार्थना आहे की, निवडणूक जिंकणे हे आमचे अंतिम ध्येय नसून आम्हा सर्वांना गोरगरिबांची, आदिवासी, ओबीसी, अनुसुचित जातींमधील बांधवांची मने जिंकण्याचा आशीर्वाद हवा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ती हवी आहे.’
A case of suicide due to online games : तरुणीने जर्मन भाषेत लिहिली ‘सुसाईड नोट’ !
‘आदिवासी बांधवांनी आम्हाला खूप प्रेम दिले. भरभरून आशीर्वाद दिलेत. आज आमदार म्हणून या ठिकाणी दर्शनाला आलो आहे. पौष महिन्यातील यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. दरवर्षी याठिकाणी श्रद्धा आणि भक्तीभावाने जात-पात न बघता अनेक लोक येतात आणि इथून जाताना ऊर्जा, शक्ती, आशीर्वाद घेऊन जातात, याचा मनापासून आनंद वाटतो. आज आपण सर्वांनी एकत्र येऊन माझे स्वागत केले आणि मला खूप प्रेम दिले, त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे,’ या शब्दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.