Breaking

Illegal residence of Bangladeshis and Rohingyas : फक्त तक्रार आली; पुरावे आलेच नाही !

Only complaint no evidence : तहसीलदारांनी फेटाळले आरोप

Amravati अंजनगाव सूर्जी तालुक्यात गेल्या सहा महिन्यांत एक हजाराहून अधिक बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लीम यांना खोटे पुरावे दाखले, कागदपत्राच्या आधारावर जन्माचा दाखला अंजनगाव सूर्जीच्या तहसीलदारांनी दिले आहेत, असे सोमय्या यांच्या तक्रारीत नमूद आहे. पण ही माहिती केवळ फोनवर देण्यात आली आहे. त्याचे कुठलेही पुरावे आलेले नाहीत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंगे वास्तव्याला आहेत. त्यांना खोट्या प्रमाणपत्रावर दाखले दिल्या जात असल्याची तक्रार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तक्रारीतील मुद्द्यांची शहानिशा करण्यासाठी दर्यापूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

Nagpur Municipal Corporation : ठरलं..! नाग नदी प्रकल्प पाच टप्प्यात राबविणार!

मालेगावसाठी नियुक्त केलेल्या एसआयटीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून त्यात अंजनगावसुर्जी तालुक्याच्याही समावेशाची विनंती त्यांनी केली आहे. त्याबाबत गुरुवारी किरीट सोमय्या यांच्यासोबत फोन कॉलवरून बोलणे झाले. त्यांना त्याबाबत पुरावे मागितले. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून कुठलेही पुरावे देण्यात आले नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तहसीलदारांनी फेटाळले आरोप
अंजनगाव सूर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी भाजप नेते सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अंजनगाव सूर्जी तहसीलमधून कुठल्याही बांगलादेशीला जन्मदाखला दिलेला नाही, असं पुष्पा सोळंके यांनी स्पष्ट केलंय.

Sachin Pilot : इंडिया आघाडी दिल्लीत अस्तित्वात नाही का?

569 जणांना दिले जन्म प्रमाणपत्र
अंजनगाव सूर्जी तहसील अंतर्गत वर्षभरात 569 जणांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. यापैकी 485 दाखले हे अर्ज प्राप्त झाल्याप्रमाणे मुस्लिम व्यक्तींना देण्यात आले असून, 84 दाखले हे हिंदू व्यक्तींना देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 1000 च्या जवळपास अर्ज अद्याप पेंडिंग आहेत. हे अर्ज त्रुटीमध्ये असल्यामुळे त्यांची छाननी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पुष्पा सोळंके यांनी दिली.