Revenue Department takes strong action against sand mafia : चोखा सागरातील दहा बोटींना स्फोटकांनी केले उद्ध्वस्त
Buldhana रेती राजकारणात नेत्यांची चहूबाजूंनी वाढती गुंतवणूक आणि प्रशासनावर सततचा दबाव यामुळे कायदा व सुव्यवस्थेला मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशात संत चोखा सागरातील (खडकपूर्णा धरण) अवैध रेती उपशावर महसूल विभागाने मोठी आणि धाडसी कारवाई करून दहा बोटींना स्फोटकांच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्याने खळबळ उडाली आहे.
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकाने बोटींवरील मजुरांना अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र बहुतेक मजूर पाण्यात उडी मारून पळून गेले. कारवाईदरम्यान बोटी पाण्यातून बाहेर काढणे अशक्य असल्याने त्याच ठिकाणी जिलेटिनच्या साहाय्याने उडवून देण्यात आल्या.
Nagpur Municipal Corporation : बस महानगरपालिकेची, शेल्टर नगरपंचायतचे!
स्थानिक पातळीवर अनेक राजकीय पुढारीच रेतीव्यवसायात गुंतल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे. वाहतूक करणारी वाहनेदेखील त्यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईवर दबाव येत असल्याची कबुली काही अधिकाऱ्यांनी खासगीत दिली आहे.
ही कारवाई जनतेतून स्वागतार्ह मानली जात असली तरी, सत्ताधारी गटातील काहींच्या हालचालींमुळे यापुढील कारवाया अडथळ्यात येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. रेतीमाफियांना राजकीय आश्रय मिळत असल्याने महसूल विभागाला वारंवार जीवावर उदार होऊन कारवाया कराव्या लागत आहेत.
Vidarbha Farmers : बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव व संपूर्ण महसूल यंत्रणेने ही मोहीम राबवली. यामध्ये अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जलाशयात उतरून बोटी ताब्यात घेतल्या. मात्र, ही कारवाई टिकवण्यासाठी आणि अवैध उत्खनन कायमचं थांबवण्यासाठी प्रशासनाला राजकीय पाठबळ मिळणं तितकंच गरजेचं आहे.