Breaking

Illegal sand smuggling: महसूल मंत्र्यांना व्हिडिओ कॉल, आमदारांनी live दाखविले अवैध रेतीसाठे!

MLC Dadarao keche dials video call to Chandrashekhar bawankule : पात्रातून रेती उपसा करण्यात आल्याचेही दिसले; आमदारांनी तस्करीचा डाव उधळला

Wardha आमदार दादाराव केचे शनिवारी दुपारी थेट रेती घाटावर धडकले. रेतीघटावर पाहणी करीत असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यांना फोन आला. आमदारांनी त्यांना अवैध रेतीसाठे लाइव्ह दाखवले. महसूलमंत्र्यांनी रोष व्यक्त केला. आणि अधिकाऱ्यांना सुनावले देखील.

आर्वी तालुक्यातील वर्धा नदीकाठावरील देऊरवाडा परिसरात अवैध रेतीसाठा आहे. काही दिवसांपूर्वी ५० ब्रास रेती जप्त केली होती. ही रेती पुन्हा तस्करांच्या घशात घालण्याचा डाव यंत्रणेने रचला होता. मात्र, शनिवारी दुपारी आमदार दादाराव केचे थेट घाटावर धडकले. त्यांनी रेती साठ्याची पाहणी केली. देऊरवाडा परिसरात आमदारांना मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध साठे दिसून आले.

मोटर, पाइप, चाळण्या, भांडी, इतर साहित्य, रेती साठवणीसाठी केलेली जागा, आदी तेथे आढळले. काही साहित्य झुडुपांत लपवून ठेवले होते. आमदारांनी याबाबत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार आदींना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.

Unfulfilled dream of Dasarwar : दासरवारांचं अपूर्ण स्वप्न मुनगंटीवारांनी केलं पूर्ण !

यावेळी जप्त केलेल्या ५० ब्रास रेतीतून तस्करांनी वाळू चोरून नेल्याचेही दिसून आले. जप्त रेतीसाठ्यातून रेती चोरीस गेल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोज सायंकाळी, रात्री अनेक टिप्पर, ट्रकद्वारे रेतीची वाहतूक केली जाते. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांकडून सुरू आहे.

Terrorist attack in Pahalgam : भीती, चिंता आणि थरारक अनुभव!

दरम्यान, वर्धा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रात्री यंत्राच्या सहाय्याने अवैध रेती उपसा केला जातो. तस्करांना अधिकारी पाठीशी घालतात. दुसरीकडे घरकुलधारकांना रेती मिळत नही. रेती तस्करीत महसूल व पोलिस प्रशासन गुंतले असल्याने त्यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे.