Chandrashekhar Bawankule alleges that the Congress party has lost its direction : लहान गावांतील कार्यकर्तेही आता काँग्रेसमध्ये राहायला तयार नाहीत
Nagpur : पी. चिदंबरम मोठे नेते आहेत. त्यांनीच जर इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली आहे, तर नक्कीच त्यांना काहीतरी जाणवलं असणार. सध्या परिस्थिती तर अशी आहे की, लहानतल्या लहान गावांतील कार्यकर्तेही आता काँग्रेसमध्ये थांबायला तयार नाहीत. नेत्यांच्या आपसी भानगडींमुळे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. काँग्रेस पक्ष दिशाहिन झाला आहे, असा हल्लाबोल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
नागपुरात आज (१६ मे) महसूल मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘इंडिया आघाडी पूर्णपणे अबाधित राहिली तर आनंदच आहे. पण इंडिया आघाडी तुटत चालल्याचं दिसतंय’, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नुकतंच केलं. यासंदर्भात विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नेते, कार्यकर्ते काँग्रेस सोडून जातील. सद्यस्थितीतही काँग्रेसचे अनेक लोक आमच्याकडे येत आहेत. संग्राम थोपटे यांच्या घराण्याचा काँग्रेसने अपमान केला. त्यामुळे पुढील काळात काँग्रेस संपताना दिसेल. दुसरीकडे शरद पवार यांचा कल अजित पवारांकडे वाढलेला दिसतोय. उबाठा शिवसेनेचंही बरंच बरं आहे. सध्या भाजपसारखा मजबूत आणि मोठा पक्ष दुसरा कोणताही नाही.
नवीन नागपूरच्या रचनेबद्दल प्रश्न विचारला असता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नागपूरचा संकल्प केला आहे. नवीन शहर तयार व्हावं, तेथे लोकांना स्वस्तात घर मिळावं, यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. नवीन नागपुरात सर्व इन्फ्रास्ट्रक्चर असलेली घरे बांधली जाणार आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : पुस्तकाचं नाव चुकलं, ‘नरकातला राऊत’, असं पाहिजे होतं !
महाराष्ट्रातील भटके समाज अनेक जिल्ह्यांत भटकंती करत असतात. पालावर आणि पोडांवर ते राहतात. या समाजाला आपण आता रेशन कार्ड देतो आहे. ते ज्या जिल्ह्यांत असतील, त्या जिल्ह्यांतून ते रेशन घेऊ शकतील. त्यांना अंत्योदयचे लाभार्थी समजले गेले पाहिजे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य निर्णय घेतील, असे महसूल मंत्र्यांनी सांगितले. पांदण रस्त्यांसाठी पोलिस बंदोबस्ताकरता आधी शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत होते. पण आता ते लागणार नाहीत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी अत्यंत चांगला निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.