Breaking

India Alliance meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत !

Shinde group, BJP launch a fierce attack on Thackerays Hindutva : शिंदे गट, भाजपाची ठाकरेंच्या हिंदुत्वावर जोरदार टोलेबाजी

New Delhi : इंडिया आघाडीच्या काल राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि नेते आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचे फोटो समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आसन व्यवस्थेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत टोलेबाजी सुरू केली आहे.

बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील सादरीकरण केले. मात्र, बैठकीच्या फोटोंमध्ये उद्धव ठाकरे अखेरच्या रांगेत दिसल्याने विरोधकांनी संधी साधली. शिंदे गटाचे नेते आणि नरेश म्हस्के यांनी समाज माध्यमावर म्हटले, “बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान शिकवला. शिवरायांनी अपमानाविरुद्ध पेटून उठण्याचा धडा दिला. तुम्ही हे काहीच घेतलं नाही का? काँग्रेसने तुमची काय अवस्था करून ठेवली आहे. तुमच्यापेक्षा एक-एक खासदारवाले पक्ष बरे; त्यांना पुढच्या रांगेत बसवलं, आणि तुम्ही मात्र महाराष्ट्राची दिल्लीला जाऊन लाज घालवलीत.”

Vande Bharat train : शेगावला वंदे भारतचा थांबा, भाविकांना मोठा दिलासा

भाजप नेते केशव उपाध्ये यांनीही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “भाजपासोबत असताना उद्धव ठाकरेंना किती मान-सन्मान मिळायचा. देशातील भाजपाचे अनेक नेते मातोश्रीवर जाऊन आदर करत. २०१९ मध्ये अमित शाह स्वतः मातोश्रीवर आले होते. पण हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि त्यातून मान-सन्मान गेला. हातात उरलं काय? तर बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग.”

इंडिया आघाडीतील ही बैठक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात असताना, आसनव्यवस्थेच्या मुद्द्यावरून उडालेल्या या वादामुळे ठाकरे गटावर विरोधकांनी दबाव वाढवला आहे. यामुळे आगामी दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी गरम वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Waqf Board lands : वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील रहिवाशांना पट्टे मिळणार !

दरम्यान या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, पीपीटी प्रेझेंटेशन पाहण्यासाठी आम्ही सगळे स्वतःहून मागे बसलो होतो. समोर बसल्यानंतर हे प्रेझेंटेशन व्यवस्थित पाहता येणार नव्हते. या विषयावरून टीका करण्याचा विरोधकांना अधिकार नाही.